मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा आधीपासूनच अडचणीत सापडले आहेत. त्यात आता नव्याने भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. त्यानंतर आता एका प्रकरणात पुढे आलं आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी अजून वाढू शकतात कारण त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांना आणखी तीन फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याआधी देखील त्यांच्यावर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फॅशन टीव्हीचे ऑल इंडिया हेड अली काशिफ खान हे मुख्य आरोपी असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या सर्व तक्रारींचा एकत्रित तपास मुंबई पोलीस करू शकतात अशी माहिती देण्यात आली आहे.
हे देखील पहा -
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.