Sai Tamhankar: बॉलीवूडमध्ये सईची गरुडझेप! इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत दिसणार या नव्या प्रोजेक्ट्समध्ये

Sai Tamhankar Upcoming Projects: सई ताम्हणकर एक्सेल एंटरटेनमेंटसोबत दोन नव्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून 2024 मध्ये सई बॉलीवूडमध्ये दमदार काम करताना दिसणार आहे.
Sai Tamhankar
Sai Tamhankar Saam Tv

Sai Tamhankar Upcoming Projects:

सई ताम्हणकर एक्सेल एंटरटेनमेंटसोबत दोन नव्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून 2024 मध्ये सई बॉलीवूडमध्ये दमदार काम करताना दिसणार आहे. इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्यासोबत ती 'ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये ती झळकणार आहे. बॉलीवूडमध्ये सई इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधीसोबत काय भूमिका साकारणार हे बघण आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

सई ताम्हणकर हिच्या 'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या दोन्ही आगामी प्रोजेक्टच्या घोषणा ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या स्लेटमधून करण्यात आली आहे. सई या दोन्ही प्रोजेक्ट्सचा भाग बनली आहे. या दोन्ही आगामी प्रोजेक्टबद्दल आता प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी सारख्या दोन दमदार कलाकारांचा सोबतीने सई दिसणार असून तिच्यासाठी हा क्षण खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sai Tamhankar
Aditi Rao Hydariने बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत गुपचूप केलं लग्न, तेलंगणातील मंदिरात घेतले सात फेरे

एक्सेल एंटरटेनमेंटसोबत पुन्हा काम करण्याची संधी तिला मिळाली असून या प्रोजेक्ट्स बद्दल सई म्हणाली की“ एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. कायम वेगवेगळ्या प्रोजेक्टवर एक्सेल काम करतं आणि म्हणून त्यांच्यासोबतीने काम करण्याची वेगळी मज्जा आहे. मला त्यांच्यासोबत तीनदा काम करण्याची संधी मिळाली, याहून मोठी गोष्ट काय असूश कते! 'डब्बा कार्टेल' सोबतीने " ग्राउंड झिरो " आणि " अग्नी " हे सगळेच प्रोजेक्ट्स माझ्या करिअरचा एक महत्त्वाचा भाग आहे "  (Latest Marathi News)

तिच्या आगामी प्रोजेक्ट मधल्या खास सह-कलाकारांबद्दल सई म्हणाली की, "इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी या दोघांची स्तुती करावी तेवढीच कमी आहे. दोघांच्या सोबतीने काम करण्याचा अनुभव खूप शिकवून जाणारा होता. इमरान आणि प्रतीक हे अप्रतिम अभिनेते आहेत. आम्ही सोबत काम करतोय आणि आता हे काम कधी एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. माझ्यासाठी ही एक स्वप्नपूर्ती आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बॉलीवूडमधल्या या दोन कलाकारांच्या सोबतीने काम करण याहून मोठ काय असणार "

Sai Tamhankar
अशी कपडे का घालतेस..., Disha Patani चा स्टायलिश ड्रेसमधील व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'ग्राउंड झिरो' आणि 'अग्नी' या व्यतिरिक्त सई 'डब्बा कार्टेल'मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर " डब्बा कार्टेल " रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका, शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com