Krushna G Rao: KGF फेम अभिनेत्याचं निधन, खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते कृष्णा जी राव यांचं आज, बुधवारी दुपारी निधन झालं. बेंगळुरूतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Krushna G Rao
Krushna G RaoSaam Tv

Krushna G Rao: ज्येष्ठ अभिनेते कृष्णा जी राव यांचं आज, बुधवारी दुपारी निधन झालं. बेंगळुरूतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत छोट्या छोट्या भूमिका, पण दमदार अभिनयानं लक्ष वेधणाऱ्या राव यांना केजीएफ चित्रपटातील आजोबाच्या भूमिकेनं प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

Krushna G Rao
Sayaji Shinde : अभिनेता सयाजी शिंदेंचे राजकीय नेत्यांना चिमटे; म्हणाले,'आता चांगभलं...'

कृष्णा जी राव यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. केजीएफ चित्रपटातील आजोबाचं पात्र त्यांनी साकारलं होतं. या भूमिकेनं त्यांना फिल्म इंडस्ट्रीत विशेष ओळख मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर बेंगळुरूतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Krushna G Rao
Aryan Khan: आर्यनच्या पहिल्या बॉलिवूड डेब्यूसाठी शाहरूखची पोस्ट चर्चेत; म्हणाला...

तुमकूर येथील पावागडा येथील रहिवासी असलेले कृष्णा जी राव काही दिवसांपूर्वी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेले होते. तेथे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना बेंगळुरूतील विनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. कृष्णा जी राव यांनी KGF आणि KGF Chapter 2 या दोन्ही सिनेमांमध्ये काम केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com