कंगना रणौतने आजारी असतानाही साजरा केला स्वातंत्र्य दिन; म्हणाली,'माझ्या आयुष्यात...'

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) देखील स्वातंत्र्य दिन साजरा केला, परंतु ती डेंग्यू या आजारामुळे बाहेर पडू शकली नाही. कंगना रणौतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
kangana ranaut
kangana ranautSaam tv

Kangana Ranaut News : देशातील विविध भागात नागरिकांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला. त्यामुळे देशात सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सामान्य नागरिकांपासून बॅालिवूड सेलिब्रिटींनी स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) देखील स्वातंत्र्य दिन साजरा केला, परंतु ती डेंग्यू या आजारामुळे बाहेर पडू शकली नाही. कंगना रणौतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या एका व्हिडीओमध्ये ती सोफ्यावर बसून झेंडा फडकावताना दिसत आहे.

kangana ranaut
'एक व्हिलन रिटर्न्स' नंतर आता 'तारिक'; जॅान अब्राहमची स्वातंत्र्यदिनानिमित्त नव्या चित्रपटाची घोषणा

कंगनाने स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे. त्यात कंगना म्हणाली की, 'मी माझ्या खोलीतून बाहेर पडू शकत नाही, परंतु राष्ट्रीय सणाचे चैतन्य आणि जल्लोष पाहून खूप आनंदी असल्याचे म्हटले आहे. माझ्या केअर टेकर, परिचारिका यांना एकमेकांना शुभेच्छा देताना मी पाहिले आहे.आज सकाळी पंतप्रधानाचे भाषण देखील ऐकले'.

कंगनाने पंतप्रधान मोदीच्या भाषणाचे कौतुक केले आहे. कंगना म्हणाली, एक व्यक्ती जग बदलू शकतो, असे म्हणतात ना, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागू होते. मी माझ्या आयुष्यात कधीही लोकांमधील राष्ट्रवाद,कर्तव्य आणि देशभक्तीचा असा हा उत्साह पाहिला नाही. कदाचित अशा चेतनाशक्तीला अवतार म्हणतात. जे केवळ स्वतःला उत्थान करू शकत नाही, तर शेकडो किंवा हजारो नव्हे तर संपूर्ण मानवतेचे उत्थान करतात.जय हिंद'.

kangana ranaut
'कर्नाटकात कानडी भाषा...'; मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याने शरद पोंक्षे भडकले

कंगना रणौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये व्यग्र आहे. चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी कंगनाने 'थलाईवी'मध्ये जयललिता आणि मणिकर्णिकामध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com