Viral Video: चिमुकल्याने गायले गाणे; अवघ्या काही वेळातच जयेश ट्रेंडिंगला

अहमदनगर जिल्ह्यात राहणाऱ्या जयेश खरेची घरातील परिस्थिती फार हालाकीची आहे. त्याचे वडिल ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळे वाद्य वाजवत त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करतात.
Viral Video
Viral Video Saam Tv

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील चिमुकल्याने अख्ख्या महाराष्ट्राला 'चंद्रा'ने थिरकवले आहे. या गाण्यावर अमृता खानविलकरने नृत्य केले असून तिच्यानंतर सुरेल आवाज असणाऱ्या चिमुकल्याची चर्चा होत आहे. त्याच्या व्हिडिओला सोशल मीडियावर तुफान लाईक्स मिळत असून त्याच्या आवाजाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Viral Video
Richa Chaddha: रिचा चढ्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार, बॉयकॉटवरील मौन सोडत सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

अहमदनगर जिल्ह्यातील चिमुकल्या जयेशच्या गाण्याने सर्वांनाच भूरळ घातली. राहुरी तालुक्यातील वांजुळपोई गावात राहणारा जयेश विश्वास खरे याची घरातील परिस्थिती फार हालाकीची आहे. त्याचे वडिल ऑर्केस्ट्रामध्ये वेगवेगळे वाद्य वाजवत त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करतात. परिस्थितीने स्वत:ला मोठे गायक होता आले नाही पण आपल्या मुलाला मोठा गायक करण्याचे स्वप्न उराशी आहे. जयेशमध्येही चांगला गायक होण्याची गुणवत्ता आहे. त्याला सुरांसोबत सुराचेही व्यवस्थित ज्ञान असल्याचे दिसत आहे. त्याला योग्यवेळेत संधी मिळाली तर जयेश आपल्या कुटुंबाचे नाव नक्कीच उज्वल करेल.

Viral Video
'मैत्री होऊ शकली असती पण..' सोनालीने अमृता खानविलकर सोबतच्या नात्यावर सोडले मौन

हा व्हिडीओ एका शाळकरी मुलाचा असून त्याचे गाणे तुमच्या कानावर पडताच तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहावत नाही. हा चिमुकला आपल्या शाळेतील वर्गात गाणे गाताना दिसतोय. हा मुलगा काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेली लावणी गातोय. त्याच्या आवाजात अशी काही किमया आहे की तुम्ही त्याचे गाणे संपूर्ण ऐकण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही. एका साध्या गावात भौतिक साधन सुविधा नसणाऱ्या ठिकाणी अनमोल हिरा सापडणे मोठी गोष्ट आहे.

'कृष्णा राठोड' नावाच्या शिक्षकाने हा व्हिडिओ फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. 'श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, करजगाव या शाळेत बदली झाल्यानंतर इयत्ता सहावीच्या वर्गावर गेलो. विद्यार्थ्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील विशेष गुणांची तपासणी करत असताना जयेश खरे नावाच्या विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम गाणं सादर केले..गाणं ऐकल्यानंतर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक वाक्य आठवलं या मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे' असे या शिक्षकाने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. जो लोकांना फारच भावला आहे. हा व्हिडीओ काही तासातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यावर नेटकरी भरभरुन लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com