Ranveer Singh : न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंगसाठी NGO कडून कपड्यांची 'जुळवाजुळव'

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे तुफान चर्चेत आहे. अनेक नेटकरी त्याला न्यूड फोटोशूटमुळे ट्रोल करून त्याच्यावर मिम्स तयार करत आहेत
Ranveer Singh
Ranveer Singh Saam Tv

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे तुफान चर्चेत आहे. अनेक नेटकरी त्याला न्यूड फोटोशूटमुळे ट्रोल करून त्याच्यावर मिम्स तयार करत आहेत. अमेरिकन अभिनेता बर्ट रेनॉल्ड्सला (Burt Reynolds) श्रद्धांजली म्हणून रणवीरने त्याच्यासारखे एका मासिकासाठी फोटोशूट केले होते. पण या फोटोशूटमुळे 'महिलांच्या भावना दुखावल्याबद्दल' रणवीर सिंग विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याचबरोबर देशभरात अनेक ठिकाणांहून रणवीर सिंग विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंदूरमध्ये तर एका स्वयंसेवी संस्थेने रणवीरसाठी चक्क दान म्हणून कपडे गोळा करण्याची मोहीम राबवली आहे.

Ranveer Singh
Disha Patani Video : दिशा पटानी चार पावलं चालली, दोनदा अडखळली

इंदूरमधील 'नेकी की दीवार' या एनजीओने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटनंतर तीव्र विरोध दर्शवला आहे. यासाठी 'नेकी की दीवार' या एनजीओने त्यांच्या गेटसमोर रणवीरचा एक मोठा बॅनर लावला आहे. या एनजीओने 'आमच्या इंदूरचा निर्धार आहे, देशातून मानसिक कचरा नष्ट करायचा आहे', अशा आशयाचा मजकूर बॅनरवर लिहिला आहे. त्याचबरोबर या एनजीओने एक मोठा बॉक्सही तिथे ठेवला आहे. ज्यामध्ये एनजीओ रणवीरसाठी कपडे गोळा करत असल्याचे स्पष्ट होते.

Ranveer Singh
Koffee With Karan : दीपिका पदुकोणने करण जोहरला दिला मोठा धक्का! असं झालं तरी काय?

आंदोलकांनी दावा केला की, रणवीर सिंग हा युथ आयकॉन आहे आणि त्याचे बरेच फॉलोअर्स आहेत. अशा प्रकारच्या फोटोशूटमुळे निव्वळ लोकप्रियता आणि आजच्या तरुणाईवर वाईट परिणाम होऊ शकतो, असे दिसून येते. हे असे प्रकार कमी झाले पाहिजेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com