अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल

एका मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखलSaam Tv

सुरज सावंत

मुंबई : एका मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहीम पोलिसांनी सांगितले की, मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.

अल्पवयीन मुलांसोबत अश्लील दृश्ये दाखवल्याप्रकरणी महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल
लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत सिंधुदुर्ग; टाॅप 30 स्थळांत समावेश

याआधीही महेश मांजरेकर यांच्यावर त्यांच्या 'नय वरण भट लोंचा कोन नाय कोचा' या मराठी चित्रपटात महिला आणि लहान मुलांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वकील डीव्ही सरोज यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मराठी चित्रपटात महिला आणि लहान मुलांचे अतिशय आक्षेपार्ह चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट 14 जानेवारीला सिनेमागृह आणि 'ओटीटी'मध्ये प्रदर्शित झाला आहे.

हे देखील पहा-

तक्रारीनुसार, हा चित्रपट दिवंगत जयंत पवार यांच्या कथेवर आधारित आहे आणि दोन किशोरवयीन मुलांवर आधारित आहे. जे वंचित आणि प्रतिकूल परिस्थितीत मोठे होतात आणि कट्टर गुन्हेगार बनतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com