Sushmita Sen-Lalit Modi: सुष्मिता सेन-ललित मोदी यांच्या प्रेमानं गुगललाही बहर; या सेलिब्रिटींविषयी जाणून घेण्यास लोकांना सर्वात जास्त इंटरेस्ट

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती.
lalit modi and sushmita sen most search on google
lalit modi and sushmita sen most search on googlesaam tv

Sushmita Sen Most Googled Celebrity: गूगलने सर्वाधिक वेळा सर्च केलेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. तर या यादीमध्ये ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचा या यादीत समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. गूगल सर्चने यावर्षी सर्वाधिक सर्च झालेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सुष्मिता पाचव्या स्थानी तर ललित मोदी चौथ्या स्थानी आहेत. गूगलने जाहीर केलेल्या या यादीमध्ये कच्छा बदाम गर्ल अंजली अरोरा आणि 'बिग बॉस १६ मधील सर्वांचा लाडका स्पर्धक अब्दू रोजीक यांचा देखील समावेश आहे.

lalit modi and sushmita sen most search on google
Sayaji Shinde : अभिनेता सयाजी शिंदेंचे राजकीय नेत्यांना चिमटे; म्हणाले,'आता चांगभलं...'

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांनी यावर्षी जुलैमध्ये ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांनी त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या रिलेशनशिपची बातमी समझताच बऱ्याच लोकांनी त्यांना सर्च केले आणि त्यामुळेच ते गूगल सर्च लिस्टमध्ये आले असे दिसत आहे. गुगलने 'इयर इन सर्च २०२२'च डेटा प्रदर्शित केला आहे. हा देता गेल्या ११ महिन्यात गूगलवर सर्वाधिक वेळा सर्च केलेल्या लोकांवर आधारित आहे. या यादीत स्थान मिळविणारी सुष्मिता एकमेव अभिनेत्री आहे. (Actress)

रिअॅलिटी शो 'लॉक अप'ची माजी स्पर्धक आणि कच्छा बदाम गर्ल अंजली अरोरा हिने देखील गुगल सर्च इंजिनवर सर्वाधिक सर्च केलेल्या दहा लोकांच्या यादीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्याच्याशिवाय बिग बॉस १६ चा स्पर्धक अब्दू रोजिकच सुद्धा या यादीत समावेश आहे. या यादीत पहिला क्रमांक राजकीय नेत्या नुपूर शर्माचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. अंजली अरोरा सहाव्या क्रमांकावर आहे. आणि अब्दु रोजिक सातव्या क्रमांकावर आहे. (Celebrity)

रिअॅलिटी शो लॉक अप ची माजी स्पर्धक आणि कच्छा बदाम गर्ल अंजली अरोरा हिने देखील गुगल सर्च इंजिनवर सर्वाधिक सर्च केलेल्या दहा लोकांच्या यादीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्याच्याशिवाय बिग बॉस स्पर्धक अब्दू रोजिकलाही या यादीत स्थान मिळाले आहे. या यादीत पहिला क्रमांक राजकीय नेत्या नुपूर शर्माचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. अंजली अरोरा सहाव्या क्रमांकावर आहे. आणि अब्दु रोजिक सातव्या क्रमांकावर आहे.

गूगलवर सर्वाधिक कोण सर्च झालं?

1) नुपूर शर्मा

२) द्रौपदी मुर्मू

3) ऋषी सुनक

4) ललित मोदी

५) सुष्मिता सेन

6) अंजली अरोरा

7) अब्दु रोझिक

8) एकनाथ शिंदे

9) प्रवीण तांबे

10) अंबर हर्ड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com