Varun Dhawan Post: वरून धवनने आयुष्यात पहिल्यांदा बनवला गोड शिरा, बाबा डेव्हिड धवन काय म्हणाले बघा..

वरून धवनने त्याच्या इन्स्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Varun Dhawan And David Dhawan
Varun Dhawan And David Dhawan Instagram

Varun Dhawan Viral Video: बॉलिवूड अभिनेता वरून धवन नेहमीच त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. चित्रपट असो वा सोशल मीडिया वरून त्याच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन करत असतो. तसेच त्याचे फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. महाशिरात्रीनिमित्त वरूनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो त्याच्या चहात्यांनाच नाहीतर बॉलिवूड कलाकारांना देखील खूप आवडला आहे.

वरून धवनने त्याच्या इन्स्टाग्राम एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वरून त्याचे वडिल म्हणजे डेव्हिड धवन यांना त्याने बनवलेला खास पदार्थ कसा झाला हे विचारात आहे. वरूनने महाशिवरात्री निमित्त हलवा म्हणजे शिरा बनवला आहे. डेव्हिड धवन शिरा खात असताना वरून त्यांना थांबवतो आणि शिरा कसा झाला आहे हे विचारतो.

Varun Dhawan And David Dhawan
Tamil Comedian Mayilsamy Dies: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकमुळे निधन

वरून हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे, 'डॅड मी बनविलेला शिराच्या समीक्षण करत आहेत.' यावर डेव्हिड यांनी देखील वरूनचे कौतुक करत म्हटले आहे की, 'खूपच सुंदर झाला आहे शिरा. मी पाहिल्याचं असा शिरा खातोय ज्यात माझ्यासाठी इतक्या कमी साखरेचा वापर केला आहे. मी आणखी एक वाटी शिरा खाणार आहे.'

वरूनच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. करिश्मा कपूर, आयुष्यमान खुराणा, अदिती राव हैदरी या कलाकारांनी देखील वरूनच्या पोस्टवर कमेंट केली आहे. डेव्हिड धवन यांचे कौतुक करत आहेत.

वरूनचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी भेडिया हा हॉरर कॉमेडी चित्रपट फ्लॉप ठरला. तर कियारा अडवाणी आणि अनिल कपूर यांच्यासह आलेला 'जुग जुग जियो' हा चित्रपट हिट ठरला होता.

वरुण त्याचा आगामी चित्रपट निर्माते नितेश तिवारीसोबत करणार आहे. दिनेश विजनच्या हॉरर युनिव्हर्सच्या आगामी फ्रँचायझींमध्ये तो भास्कर शर्मा उर्फ ​​भेडिया हे पात्र पुन्हा साकारणार आहे. ज्यामध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय सामंथा रुथ प्रभूसोबत राज आणि डीकेच्या 'किल्ला'मध्ये देखील तो दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com