ब्राम्हण महासंघाच्या आनंद दवेंनी माझी फसवणूक केली- शरद पोक्षेंची पोस्ट Viral

ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी आपली फसवणूक केल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला आहे.
ब्राम्हण महासंघाच्या आनंद दवेंनी माझी फसवणूक केली- शरद पोक्षेंची पोस्ट Viral
ब्राम्हण महासंघाच्या आनंद दवेंनी माझी फसवणूक केली- शरद पोक्षेंची पोस्ट ViralFacebook

प्राची कुलकर्णी

पुणे : ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी आपली फसवणूक केल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला आहे. कार्यक्रमासाठी बोलावून हॅाटेल मध्ये रहायची सोय करायचं आश्वासन देऊन हॅाटेलचे बील त्यांनी न भरल्याने आपल्याला नाहक त्रास झाल्याचं पोंक्षेंनी म्हटलं आहे. काही आठवड्यांपूर्वी पोंक्षेंच्या मी आणि नथुराम या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात झालं होतं. त्यावेळच्या हॅाटेलचे पैसे न भरले गेल्याचं पोंक्षेंनी म्हटलं आहे.

माझ्या मी व नथुराम ह्या पुस्तकाच्या ८ व्या आवृत्तीचं लोकार्पण पुण्यातील श्री आनंद दवे ह्यांनी त्यांच्या ब्राह्मण महासंघातर्फे करायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही मी व प्रकाशक पार्थ बावस्कर पुण्यात पोहोचलो. हॉटेलवर कृष्णा रेसिडेंसीवर दोन खोल्या दवेंनी बूक केल्या. कार्यक्रम संपवून आम्ही घरी परतलो. या घटनेला महिना होऊन गेला तरी आजतागयात दवेंनी कृष्णा हॉटेलचे पैसे भरलेले नाहीत, व ते फोनही ऊचलत नाहीत. ब्राह्मण संघातर्फे कार्यक्रम केला म्हणून मी हो म्हटले पण हा माणूस मला नेहमीच डँबीस आहे असा संशय होताच त्याने ते सिध्द केले. अखेर प्रकाशकांनी ते पैसे भरले. तेव्हा सर्वांनी दवे बरोबर कोणताही व्यवहार करू नये ही विनंती, सोबत त्याचा फोटो देत आहे. तसेच समस्त ब्राह्मण संघातील सभासदांनी सावध रहावे. अशी पोस्ट शरद पोक्षेंनी फेसबुकवरती केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com