Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; अपघातात अभिनेता जखमी

मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) द्रुतगती मार्गावर नवी मुंबईवरून पुण्याला (Pune) येताना उर्से गावच्या हद्दीत अतिवेगाने जाणाऱ्या कारला भीषण अपघात झाला.
Accident
AccidentSaam Tv

मावळ - मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) द्रुतगती मार्गावर नवी मुंबईवरून पुण्याला (Pune) येताना उर्से गावच्या हद्दीत अतिवेगाने जाणाऱ्या कारला भीषण अपघात झाला. यात तीन जण गंभीर जखमी झाले असून अपघातात (Accident) जखमी झालेल्यांमध्ये जुना टारझन चित्रपटातील अभिनेता हेमंत बिर्जे आणि त्यांची पत्नी अमना हेमंत बिरजे व मुलगी रेश्मा तारिक अली खान यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Actor injured in accident)

हे देखील पहा -

हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा चक्काचूर झाला. अभिनेते हेमंत बिरजे हे मुंबई वरून पुण्याला कुटुंबासह जात होते. रस्त्यात त्यांनी काही औषध गोळ्या घेतल्या त्यामुळे बिरजे यांना झोप येऊ लागली त्यातच त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ एका लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आता दोन्ही लेन वरील वाहतूक सुरळीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com