चिखलीतील खाजगी कोविड रुग्णालयाच्या 13 डॉक्टरांनी दिले सामूहिक राजीनामे

rajendra
rajendra

बुलढाणा - गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने Corona थैमान घातले आहे. या महामारिच्या काळात खाजगी रुग्णालयात Private Hospital वैद्यकीय अधिकारी आपले जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देत आहेत. पहिला टप्प्यातील कोरोना संक्रमण कमी करण्याचे मोठ कार्य या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. मात्र अलिकडच्या काळात चिखली chikhali येथील 10 खाजगी कोविड रुग्णालयात रुग्णसेवा देण्याऱ्या 13 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अचानक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे Rajendra Shingane यांच्याकडे सामूहिक राजीनामे Resignation दिले आहेत.  Mass resignation of 13 doctors of private covid Hospital in Chikhali

रुग्णसेवा  देताना सततचा राजकीय हस्तक्षेप होत असल्याने ताण वाढत होता त्यांमुळे आम्ही राजीनामे देत आहोत असे कारण दिलेल्या राजिनाना पत्रात दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

बुलढाणा जिल्हा अगोदरच कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणुन ओळखला जात आहे. बुलढाण्यात दररोज हजारच्या वर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. शासकीय रुग्णालयात कुठेही बेड उपलब्ध नाही अश्या परिस्थितीत काही रुग्ण खाजगी कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.  Mass resignation of 13 doctors of private covid Hospital in Chikhali

मात्र खाजगी रुग्णालयात कोणताही राजकीय पुढारी, नेता येऊन धमक्या देत आहेत. सतत राजकीय हस्तक्षेप वाढत  होतं तसेच ऑक्सीजनचा तुटवडा  व रेमडीसीवीर इंजेक्शनचा  तुटवडा यामुळे खाजगी रुग्णालय चालविने कठिन झाले असून मानसिक त्रास वाढला आहे. त्यांमुळे सामूहिक राजिनामे देण्याचे ठरवून चिखली येथील सर्व खाजगी रुग्णालयातील 13 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यकडे सामूहिक राजीनामा पत्र दिले आहे. आता पालकमंत्री या राजीनामा पत्रावर काय भूमिका घेतात याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com