हात धुवून घेणारा नव्हे तर गरीबांना हात देणारा डाॅक्टर!

Doctor in Beed Treating Poor Patients for Free
Doctor in Beed Treating Poor Patients for Free

बीड : कोरोनानं Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. तर ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे, ऊसतोड Sugarcane Labourers कामगारांचे, शेतकऱ्याचे आर्थिक हाल सुरू आहेत. यामुळं अनेकांवर उपासमारीची आलीय. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचं काम, बीडच्या एका तरुण डॉक्टरने सुरू केलंय. या कामामुळं त्या तरुण डॉक्टराची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे. Beed Doctor treating Poor Patients Free During Corona times

कोरोनाने आज जगणं मुश्किल केलाय...उद्योग-व्यवसाय Business बाजारपेठा बंद झाल्याने अनेकांच्या हाताला काम नाही.तर कंपन्या बंद झाल्यानं कित्येकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत.तर दुसरीकडं ग्रामीण भागातमध्ये देखील हीच परस्थिती आहे.इथल्या कामगारांना काम नाही, ऊसतोड कामगारांचे हाल सुरू आहेत.शेतात पिकतंय पण ते विकण्यासाठी बाजारपेठ नाही.यामुळं ग्रामीण भागातील नागरिकांपुढं अनेक संकट घर करून आहेत.त्यातच कुटुंबातील सदस्य आजारी पडला तर हॉस्पिटलचा खर्च पेलवत नाही. यामुळं अनेकांना सावकाराचे उंबरठे झिजवण्याची वेळ आलीये.

हे देखिल पहा - 

मात्र, एवढं सगळं सुरू असतांना या कोरोनाच्या महामारीत अनेक डॉक्टर Doctor हे हात धुवून घेत आहेत. अव्वाच्या सव्वा बिलं आकारत आहेत. मनाला वाटेल तेवढी बिलं आकारून नुसती लूट काही डॉक्टरांकडुन सुरु आहे. कुठं रेमडिसिवीर Remdisivir मधून पैसे तर कुठं रुग्ण दगावला तरी त्यातूनही पैसा काढण्याचा धंदा काही जणांनी सुरू केलाय. मात्र, बीडच्या नाळवंडी सारख्या खेड्या गावात जन्मलेल्या डॉ.रामप्रसाद राऊत यांनी, आपल्या घाटसावळी येथील हॉस्पिटलमध्ये महिनाभर मोफत उपचार देण्याचा संकल्प केलाय.

१ मे पासून सुरु केलेल्या या सेवेतून त्यांनी, घाटसावळी, मैंदा, खडकी, आंबेसावळी, मान्यरवाडी, ढेकणमोहा, यासह १० ते १५ गांवातील तब्बल ४०० ते ५०० रुग्णांवर आतापर्यंत उपचार केले आहेत. या विषयी लोहार काम करून आपलं कुटुंब चालवणाऱ्या अरुणा पडुळकर म्हणाल्या की, आज आमचं काम बंद आहे.त्यामुळं खूप अडचणी आहेत.मात्र आता मोफत दवाखाना सुरू झाल्यानं मोठा आधार मिळालाय. इथं मी दोन दिवस झाले येतेय.मला गोळ्या, इंजेक्शन, सलाईन हे मोफत दिलंय. Beed Doctor treating Poor Patients Free During Corona times

 हॉस्पिटलमध्ये Hospital उपचार घेणारे शेतकरी शिवाजी चोले म्हणाले की, मी खडकी घाट येथील शेतकरी असून, आमच्या गावात कुठलीही आरोग्याची सुविधा नाही. येण्या-जाण्यासाठी मोठी अडचण आहे. वाहन मिळत नाही. त्यातच शेतीमध्ये जास्त पिकत नाही, जे पिकतं ते विकण्यासाठी बाजार बंद आहेत. यामुळे कुटुंब कसं चालवावं हा प्रश्न समोर आहे. त्यातून दवाखाना पाठीमागे लागला तर त्याचा खर्च कुठून करावा. असे अनेक प्रश्न आहेत. मात्र डॉक्टर राऊत यांनी मोफत उपचार सुरु केल्याने. आता आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

Editd By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com