वारिस पठाणांना बोल लावणाऱ्यांनी योगी, ठाकूर यांनाही जाब विचारावा

वारिस पठाणांना बोल लावणाऱ्यांनी योगी, ठाकूर यांनाही जाब विचारावा


औरंगाबाद : आठ दिवसांपुर्वीच्या सभेत वारीस पठाण यांनी केलेले विधान वेगळ्या पध्दतीने मिडियाने सादर करणे आणि त्यावरून गदारोळ करणे योग्य नाही. एमआयएम पठाण यांच्या विधानाचे समर्थन अजिबात करत नाही. पण त्यांच्या विधानावरून आम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांनी, किंवा माफी मागायला सांगणाऱ्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीत केलेल्या ‘देश के गद्दारो को गोली मारो सालो को़', आणि एका राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांनाही जाब विचारावा अशा शब्दात आगपाखड केली.

‘तुम्ही शंभर कोटी आहात, पण आम्ही पंधरा कोटी तुम्हाला भारी‘ अशी चिथावणीखोर भाषा करत एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी खळबळ उडवून दिली आहे. मुंबईतील एनआरसी व सीसीए विरोधातील जाहीर सभेत बोलतांना पठाण यांनी हे विधान केले होतो. यावरून आता राज्यभरातून एमआयएमवर टिकेची झोड उठली आहे.


या संदर्भात एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. इम्तियाज जलील म्हणाले, आठवडाभरापुर्वीचे हे विधान मिडियाने शोधून चुकीच्या पध्दतीने दाखवले आहे. देशातील जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या, समाजा-समाजामध्ये फूट पाडणाऱ्या कुठल्याही वक्तव्याचे एमआयएम किंवा या पक्षाचा कुठलाही नेता समर्थन करत नाही. वारिस पठाण यांनी देखील केलेले विधान हे त्या भावनेतून केले नव्हते, हे त्यांनी मुंबईत स्पष्ट केले आहे.

एनआरसी, सीसीएच्या विरोधात देशात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलने, निदर्शने सुरू आहेत. मात्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय. पण देशातील नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. सरकार दखल घेत नसेल तर रागाच्या भरात एखादे चुकीचे विधान निघू शकते. आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा असद्दुदीन ओवेसी यांनी वेळोवेळी पक्षातील नेत्यांना या बाबत ताकीद दिलेली आहे. वारिस पठाण यांनी स्वःत हे विधान करण्यामागे त्यांचा हेतू वाईट नव्हता असे स्प्षट केले आहे.

वारिस पठाण यांच्या विधानावरून रान उठवणाऱ्यांनी शाहीन बागेतील आंदोलकांना गोळी घालण्याची भाषा करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देश के गद्दारो को, गोली मारो सालो को असे म्हणणाऱ्या केंद्रातील मंत्री अनुराग ठाकूर यांनाही कधी तरी जाब विचारला पाहिजे, त्यांनाही माफी मागायला सांगितले पाहिजे असा टोला प्रसारमाध्यमांना लगावला.

WebTittle :: 

Yogis and Thakurs should also ask Jabis who call him heirs

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com