लॉकडाऊननंतर न ऐकलेली लोकं 'हे' बंद केल्यानंतर तरी घरात बसतील का?

STAY AT HOME 960
STAY AT HOME 960

पुणे - पुण्यात कोरोनाचा पहिली रुग्ण आढळला होता. त्यानंतर पुण्यात लगेच जमावबंदी लागू करण्यात आली. आधी सरकारी कार्यालयं आणि त्यानंतर हॉटेल्स मॉल्स जिम असं सगळंच हळू हळू बंद करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे शनिवारपासून महत्त्वाची शहरं लॉकडाऊन करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशच दिले. कोरोनाचा संसर्ग रोखण्याठी महत्त्वाची पावलं उचलली गेली. मात्र तरीही रुग्णांची संख्या वाढतेच आहे. अशात आता पुण्यात आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

आता खासगी वाहनांवरही बंदी

पुणेकरांना आता पूर्णवेळ घरातच थांबावे लागणार आहे. कारण पुण्यात खासगी वाहनांवरही बंदी घालण्यात आलीय आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान  रविवारी शहरामध्ये "जनता कर्फ्यु'ला पुणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पुण्यातील रस्ते गेले आठवडाभर सुन्न झाले आहेत. प्रत्येकाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. गर्दी पुर्णपणे रोखण्यासाठी आता खासगी वाहनांवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कुणालाच घराबाहेर पडता येणार नाही आहे. 

सिंहगड रस्त्यावर अभिरूची पोलिस चौकी समोर पोलिसांनी रिकामटेकड्यांना चांगलाच प्रसाद दिला. सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सर्वच सिग्नलही सुरू आहेत. अनेक जण दुचाकीस्वार गल्ली बोळानं फिरत असल्याचं चित्र दिसतय. लोकांना समजावून सांगून देखील ते घराबाहेर पडत असल्यानं थेट पोलिसांनी रस्त्यावर आडवून दुचाकीस्वारांना प्रसाद दिला.त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच घाबरगुंडी उडालीय, जिथं आहेत तिथून वाहनचलाक गाड्या पळवत असल्याचं दिसून आलं. 

PMPMLची सेवा बंद

तसंच पुण्यात PMPMLची सेवा बंद करण्यात आलीय. पाठपुरावा करूनही बंदचे आदेश न निघाल्यानं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी PMPMLचं मुख्यालय गाठलं. त्यानंतर महापौर मोहोळ यांनी PMPMLच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना सूचना दिल्या. त्यानुसार आज (23 मार्च) संध्याकाळपासून PMPML बसेस बंद करण्यात आल्यात. आता अत्यावश्यक सेवेपुरत्याच बस उपलब्ध होणार आहेत. 

डोमेस्टिक विमान उड्डाणं रद्द

देशांतर्गत विमानसेवा उद्यापासून (24 मार्च) बंद ठेवण्यात येणारंय. मध्यरात्री 12 वाजल्यापासून विमानसेवा रद्द असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या काळात फक्त कार्गो विमानांच्या उड्डाणांना परवानगी असेल. 

नाशिकमध्ये पेट्रोल खरेदीवर मर्यादा

नाशकात आता वाहनांसाठी पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवर मर्यादा आणल्या आहेत. दुचाकीसाठी एकावेळी फक्त 100 रुपयांचं आणि चारचाकीसाठी एकावेळी फक्त एक हजार रुपयांचं इंधन मिळणार आहे. त्याचसोबत वारंवार पेट्रोलपंपावर येणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली.

पाहा व्हिडीओ - 

will people stay at home after strick decision made by officials to prevent corona covid 19 marathi pune nashik mumbai maharashtra international 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com