''या'' व्हॉट्सॲप ग्रुपचा नादच खुळा; कोरोना रुग्णांसाठी जमविले सव्वा लाख रुपये

baramari
baramari

सोशल मीडियावर आपण काय करू शकतो हे बारामती तालुक्यातील समाजसेवा या व्हॉट्सॲप ग्रुपने दाखवून दिले आहे. ग्रुपच्या सदस्यांनी दोन दिवसात तब्बल सव्वा लाख रुपयाचा निधी गोळा केला आहे. आणि हा निधी बारामती आणि  पुरंदर तालुक्यातील एकुण नऊ कोविड सेंटरला वाटप केला आहे. बारामती तालुक्यातील निंबुत येथील शेतकरी कृती समितीचे जिल्हा सरचिटणीस मदन काकडे यांनी ८ सप्टेंबर २०१४ रोजी बारामती तालुक्यात बारामती, पुरंदर, फलटण व खंडाळा भागातील लोकांना एकत्र घेत व्हॉट्सॲप या  सोशल मीडियावर समाजसेवा नावाने ग्रुप सुरू केला. या ग्रुपमध्ये सर्वच क्षेत्रातील लोक आहेत. या ग्रुपमध्ये विविध सामाजिक विषयावर नियमित चर्चा होत असते. या ग्रुपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागते.

हे देखील पाहा 

सद्या राज्यात कोविड चे रुग्ण वाढत चालल्याने आपणदेखील फुल ना फुलाची पाकळी द्यावी या उद्देशाने ग्रुपचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे यांनी ही कल्पना मांडली. ग्रुप ॲडमिन मदन काकडे यांनी ग्रुपवर याबाबत आवाहन केले. आणि आश्चर्य झाले दोनच दिवसात कोणी दोनशे, कोणी पाचशे तर कोणी हजार रुपये जमा करत तब्बल सव्वा लाख रुपये जमा केले.(WhatsApp group raises Rs 1.15 lakh for Corona patients)

आज हा निधी वाटप शुभारंभ करण्यात आला. वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटरला २१ हजाराचा धनादेश सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचेकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील सोशल मीडियावर समाजसेवा ग्रुप हा तालुक्यातच काय पण आता जिल्ह्यात गाजू लागला आहे. सामाजिक बांधिलकी जपत व्हॉट्सॲपवरील या ग्रुपने कोविड रुग्णांसाठी तब्बल सव्वा लाख रुपयांचा निधी गोळा केला आहे. सोशल मीडियावरील कोविड रुग्णांसाठी सव्वा लाख रुपयांचा निधी गोळा करणारा समाजसेवा ग्रुप हा पूणे जिल्ह्यातील एकमेव ग्रुप ठरला आहे. सोशल मीडियाचा वापर हा सुरुवातीच्या काळात केवळ मनोरंजन आणि टाईमपास म्हणून केला जात होता मात्र आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत  कोरोना ग्रस्तांना मदत देखील होतेय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com