अतिवृष्टीमुळे भाजीपाला - फळ महागले; भाज्यांचे दर तुम्हीच पाहा

अतिवृष्टीमुळे भाजीपाला - फळ महागले;  भाज्यांचे दर तुम्हीच पाहा

परभणी : अतिवृष्टीने भाजीपाल्याचे झालेले नुकसान आणि थांबलेली लागवड यामुळे बाजारात  फळ आणि पालेभाज्यांची अावक घटली आहे. त्यामुळे भाजीपाला प्रचंड महागला आहे. तुरळक स्थानिक शेतकऱ्यांकडे भाजीपाला असून बाहेरची देखील अावक मंदावली आहे.

यंदा पावसाळ्यात स्थानिक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केल्याने सप्टेंबर अखेरीस स्थानिक भाजीपाल्याची अवक वाढली होती. त्यामुळे दरही कोसळले होते. मात्र, त्यानंतर २० दिवस झालेल्या अतिवृष्टीने भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक थांबली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर आठ दिवसांपासून वाढले आहेत.

परभणीत पाथरी रस्त्यावर होणाऱ्या भाजीपाल्याच्या बिटात आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाला महाग झाला आहे. ग्राहकांना भाजीपाला विकत घेताना खिशाला झळ पोहचत आहे. शहरातील ग्राहकांसोबत ग्रामीण भागातही आठवडी बाजारातून शेतकऱ्यांनाही महागडा भाजीपाला विकत घेण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांजवळ भाजीपाला असतो तेंव्हा त्याला बाजारात किंमत नसते.

व्यापाऱ्यांची चांदी

अगदी मातीमोल भावाने शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल विकतात अन् शेतकऱ्यांजवळील माल संपताच त्याला सोन्यासारखा भाव येतो. ही स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जाते. यात ग्राहक आणि शेतकरी यांना कोणताही लाभ मिळत नाही उलट मधले व्यापारी आणि विक्रेते यांचे मात्र चांगभल असते. सध्या स्थानिक भाजीपाला तुरळक स्वरुपात असून तोही खराब झालेला आहे. त्यामुळे पुण्याहुन भाजीपाला येत आहे. बाहेरहुन येणारी अावक देखील अल्प प्रमाणात असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
 
कोथींबीर गायब

बाजारातून कोथींबीर दुर्मीळ झाली असून ज्यांच्याकडे आहे तिचे दर पाहुन तोंडचे पाणी पळत आहे. तब्बल २०० रुपये किलो अर्थात १०रुपये छटाक याप्रमाणे कोथींबीर मिळत आहे.

परभणीतील भाज्यांचे दर (प्रति किलाे) 
शिमला-४०
गवार -६० ते ८०
मिरची-४०
बटाटे-३०
बीन्स-८०
फुलकोबी-६० ते ८०
पत्ताकोबी-४०
दोडका-१०० ते १२०
कारले-६० ते ८०
कोथीबींर-२००
दुधी भोपळा-४०
पालक-६०
काकडी-४०
वांगे-६०
शेपु-६०
 
Web Title: Vegetable prices dropped

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com