यवतमाळ - आम्हीच राज्याचा विकास केला, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. आम्ही या पोकळ घोषणेचा पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आव्हान दिले होते. हे आव्हान मी स्वीकारले असून कुठेही चर्चेसाठी तयार आहे, असे प्रतिआवाहन माजी खासदार तथा काँग्रेसचे राज्य प्रचार समितीप्रमुख नाना पटोले यांनी दिले.
ते आज येथे आयोजित काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेत बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार यशोमती ठाकूर, माजी खासदार राजीव सातव, आमदार तथा जिल्हाध्यक्ष डॉ. वझाहत मिर्झा, बाबासाहेब गाडे पाटील, जीवन पाटील, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, नगरसेविका वैशाली सवाई आदी उपस्थित होत्या.
पटोले म्हणाले की, सरकार दबावतंत्राचा वापर करीत आहे. मी बोलत असल्याने माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. गरिबांचे प्रश्न आम्ही सोडवू, असे पंतप्रधान मोदी सांगत आहेत. माझ्या मते देशात दोनच गरीब आहेत. एक अदानी तर दुसरे अंबानी, असेही नाना पटोले म्हणाले.
Web Title: Nana Patole Talking Politics
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.