सध्याची चर्चा लाॅकडाऊनच्याच दिशेने - डाॅ. राजेश टोपे यांचे सूचक वक्तव्य

Rajesh Tope
Rajesh Tope

मुंबई : राज्यात कोरोनाची(Corona) रुग्णसंख्या वाढत आहे.त्यामुळे राज्यात लॉकडाऊन(Lockdown) लावायचा की नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स आणि आरोग्य यंत्रणेबरोबच सर्व यंत्रणेशी बोलणी सुरु असून मुख्यमंत्रीच याबाबत अंतिम निर्णय घेतील ,अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. We will Impose Strict Rules to curb Corona Say Rajesh Tope

आम्ही लगेच लॉकडाऊनवर जाणार नाही,मात्र सध्या यंत्रणेशी केली जाणारी चर्चा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे देखील टोपे यांनी म्हटलंय आहे. लॉकडाऊनचे चांगले आणि वाईट परीणाम होत असले तरी जीव गेल्यापेक्षा जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. मात्र सध्या निर्बंध कडक करण्यावर राज्यसरकारचा अधिकचा भर असून लॉकडाऊन लावण्यासाठी तयारीही करून ठेवावीच लागते, असं सांगत एका बाजूला राज्यात लॉकडाऊनची तयारीही सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. We will Impose Strict Rules to curb Corona Say Rajesh Tope

राज्यातील ४५ वर्षांवरील नागरीकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावं, सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मास्क (Face Mask) वापरुन सोशल डिस्टनसींग (Social Distancing) पाळलं तर कोरोना होणार नाही, असं सांगायलाही टोपे विसरले नाहीत. राज्यातील (Maharashtra) नागरीकांनी सोशल डिस्टनसींग पाळल्यास लॉकडाऊन लावण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही असंही त्यांनी म्हणले आहे.मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध कडक करणं गरजेचं असून मुंबईत (Mumbai) टेस्टिंग, ट्रेसिंगचं प्रमाण वाढवण्यात आलं असून तिथे एक दोन हॉस्पिटलचा अपवाद वगळता बेडची कमतरता नसल्याचं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी वन बूथ टेन युथ प्रमाणे तरुणांना विश्वासात घेऊन ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करून घ्याव असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे.We will Impose Strict Rules to curb Corona Say Rajesh Tope

Edited By-Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com