मावळच्या महत्वाच्या तीनही धरणांमधून विसर्ग

मावळच्या महत्वाच्या  तीनही धरणांमधून विसर्ग

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने महत्वाच्या तीनही धरणातून पाणी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून दमदार पाऊस पडत आहे. चोवीस तासात बुधवारी सकाळी वडगाव येथे ५४ मिलीमीटर, तळेगाव दाभाडे येथे ५० मिमी, कामशेत येथे १२४ मिमी, कार्ला येथे १५३ मिमी, पवनानगर येथे १०६ मिमी, वडीवळे येथे ९६ मिमी, लोणावळा येथे २१० मिमी व शिवणे येथे २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

तालुक्यातील धरणे यापूर्वीच १०० टक्के भरल्याने व पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी पहाटेपासून सर्व धरणातुन पाणी विसर्ग सुरु करण्यात आला. पवना धरणातून प्रतिसेकंद ६००० क्युसेकने, वडीवळे धरणातुन २५०० क्युसेकने तर आंद्रा धरणातून प्रतिसेकंद १४०० क्युसेकने याप्रमाणे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: water released increased from three dams in maval taluka

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com