राज ठाकरेंच्या सभेत विघ्न

 राज ठाकरेंच्या सभेत विघ्न

पुणे :  लोकसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे न करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपली पहिली राजकीय सभा पुण्यात घेत आहेत. आज सायंकाळी सहा वाजता बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने त्या मैदानावर पाणी साचले असून चिखल झाला आहे. त्यामुळे या मैदानावर आज राज ठाकरे यांची सभा कशी होणार याची चिंता सर्वांना लागली आहे.

'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदी-शहा यांच्यावर तुटून पडलेल्या राज यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे राज ठाकरे विधानसभेसाठी कोणता मुद्दा उपस्थित करणार याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा शुभारंभ शहरात राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने आज होणार आहे. पण या सभेत सतत काही ना काही विघ्न येत आहेत. सुरवतीला त्यांना पुण्यात सभेसाठी मैदान मिळत नव्हते. आता, मैदान मिळाले परंतू पावसामुळे ते चिखलमय झाले आहे. 

मनसेचे कार्यकर्ते मैदानात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज काहीही झाले तरी राज ठाकरे यांची सभा होणारच असे त्यांनी ठरविलेच आहे. त्यामुळे पुण्यात राज ठाकरे यांची सभा निर्विघ्न पार पडते का याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
 


Web Title: Water Logging on the Ground where Raj Thackeray campaign rally in Pune for Maharashtra Vidhda Sabha 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com