कृष्णा कारखान्यासाठी 'या' तारखेला होणार मतदान

karkhana sakhar.
karkhana sakhar.

कराड: पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जाणारा कराड Karad तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा Yashwantrao Mohite Krishna Cooperative Sugar Factory निवडणुकीचे Voting बिगुल वाजले. 29 जूनला या कारखान्यासाठी मतदान होणार आहे. Voting for Krishna factory will be held on this date

सातारा Satara आणि सांगली जिल्ह्यातील सधन अशा पाच तालुक्यांमध्ये या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan , सहकार मंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil, जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil, राज्यमंत्री विश्वजीत कदम Viswajit Kadamअशा दिगजांच्या विधानसभा मतदार संघात या कारखान्याचे कार्यक्षेत्र येत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे.

हे देखील पहा -

सध्या या कारखान्याची सत्ता डॉ. सुरेश भोसले यांच्या गटाकडे आहे तर त्यांच्या विरोधात माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि इंद्रजीत मोहिते यांनी शड्डू ठोकला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या निवडणुकीची तयारी तीनही गटांकडून सुरू आहे.  Voting for Krishna factory will be held on this date

कृष्णाच्या निवडणुकीसाठी 25 मेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे तर 29 जूनला मतदान होणार आहे. 1 जुलैला मतमोजणी होऊन चित्र स्पष्ट होईल. या कारखान्याचे सुमारे 48 हजार सभासद आहेत. त्यामुळे कोरोना च्या पार्श्वभूमीवर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया राबवणं  प्रशासनापुढं आव्हान ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com