भाजप देणार सेनेला महत्वाच्या जागा 

 भाजप देणार सेनेला महत्वाच्या जागा 

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. निवडणुकीला सामोरे जाताना १३५-१३५ अशा समसमान जागा देणे शक्‍य नसले, तरी शिवसेनेला निवडून येणाऱ्या जागा देण्याचे आश्‍वासन भारतीय जनता पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी ‘मातोश्री’ला दिले आहे.

शिवसेनेला केवळ ११५ जागा देता येतील, असा निरोप भाजपने शिवसेनेला पाठवला होता. गणेश विसर्जनानंतर  यासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चाही झाली होती. मात्र शिवसेनेने समसमान जागांचा आग्रह धरीत १३५ जागांची मागणी लावून धरल्याने गेले दोन दिवस चर्चा पूर्णत: ठप्प होती. आज पुन्हा एकदा काही मध्यस्थांच्या मार्फत शिवसेनेला शांत केल्यानंतर भाजपने महत्त्वाच्या म्हणजेच जिंकण्यायोग्य जागा शिवसेनेला देता येतील, असा प्रस्ताव पाठवला आहे. संपूर्ण राज्यात विभागवार प्रतिनिधित्व, प्रत्येक जिल्ह्यातील सैनिकांना बळ या गरजा आम्हीही पक्ष म्हणून समजून घेऊ शकतो. युतीत त्या मताचा आदर राखता येईल, असे शिवसेनेला कळविण्यात आले आहे. 


शिवसेनेतील काही जहाल नेत्यांचा आग्रह आपण १२५ च्या खाली उतरू नये, असा आहे पण तो मान्य होणे अशक्‍य असल्याचे भाजपने कळवले आहे. आदित्य ठाकरे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा प्रस्ताव स्वीकारावा, असे उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या काही नेत्यांनी त्यांना समजावल्याचेही समजते. शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी १० जागांचा अपवाद वगळता अन्य सर्व उमेदवार पुन्हा निवडून येतील असे मानले जाते, त्यातच जिंकलेल्या जागांएवढ्या जागा मिळत नसल्या तरी महत्त्वाचे मतदारसंघ मिळणे फायद्याचे आहे. हे गणित लक्षात घेतच आज युवानेते आदित्य ठाकरे यांनी युती कायम राहील, असे स्पष्ट केले.


Web Title: Vidhansabha Election 2019 Important Seats Shivsena BJP Politics
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com