भाज्यांचा ‘भाव’गगनाला भिडला 

भाज्यांचा ‘भाव’गगनाला भिडला 

मुंबई: मुंबई शहराला भाज्यांचा सर्वाधिक पुरवठा नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून होतो. बाजार समितीत प्रामुख्याने नाशिक, नगर तसेच ठाणे जिल्ह्याच्या काही भागातून भाज्यांची आवक होती. पण यंदा या सर्वच भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे भाज्या लवकर खराब होऊ लागल्या आहेत. परिणामी भाज्यांची आवक रोडावली आहे. त्यातून दरवाढ होत आहे.


सततच्या पावसामुळे भाज्यांची आवक रोडावली आहे. परिणामी भाज्यांच्या किमती कडाडू लागल्या आहेत. मुंबईत काही ठिकाणी कांदा ६० रुपये किलोच्या घरात गेला असून, अन्य भाज्यांची विक्रीही सरासरी ८० रुपये किलोनेच होत आहे.

वाशी येथून मुंबईत भाजी आणण्याचा सरासरी खर्च किलोमागे ६ ते ८ रुपये असतो. यामुळे भाज्यांचे घाऊक दर दररोज ६ ते ८ रुपये वधारल्यास किरकोळ बाजारात ही वाढ १२ ते १४ रुपये होते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सर्वच भाज्या किरकोळ बाजारात १०० रुपये किलोवर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वाशी बाजारपेठेतील घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले की, 'भाज्यांची आवक रोज दोन ते चार टक्के कमी होत आहे. ज्या भाज्या बाजारात पोहोचतात त्यातीलही ३० ते ४० टक्के माल खराब असतो. त्यामुळे भाज्यांची दररोज दरवाढ होत आहे. प्रामुख्याने कांदा, बटाटा, भेंडी, कोबी या सर्वाधिक मागणीच्या भाज्यांचे दर रोज किलोमागे १ ते ३ रुपयांनी वधारत आहेत.'

प्रमुख भाज्यांचे दर (प्रति किलोनुसार)

भाजी जुने दर सध्याचे दर

बटाटा २२ २८

कांदा ४० ६०

कोथिंबिर ४० ६०

हिरव्या मिरच्या ६० ८०

कोबी ४० ५०

फ्लॉवर ८० १००

भेंडी ४० ६०

ढोबळी मिरची ४० ६०

Web Title: vegetable prices rise significantly

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com