उद्धव ठाकरे पंतप्रधान निवासस्थानी दाखल

उद्धव ठाकरे  1.jpg
उद्धव ठाकरे 1.jpg

वृत्तसंस्था  :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहचले  आहेत. या भेटीत गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षण, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि जीएसटी भऱपाई थकबाकी यासह अनेक महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्री  चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  विशेष म्हणजे  मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर   राज्याचे  एक शिष्टमंडळदेखील पंतप्रधान मोदींची भेट भेट घेणार आहेत. या  शिष्टमंडळात  मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री यांच्यासह  मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा समावेश आहे, अशी माहीती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या भेतीपूर्वी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात मराठा आरक्षणाविषयी चर्चा केली,  असेही मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने  मराठा आरक्षणाबद्दल  दिलेल्या निकालानंतर  उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.  तसेच त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करणारे पत्रही राज्यपालांकडे दिलं होते. तर  येत्या काही कळत नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटल होतं. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेणार आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ मुंबईहून विमानाने दिल्लीत पोहचले असून दिल्लीतील  लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान  यांच्या निवासस्थानी हे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे. तर बैठकीनंतर लगेच हे शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना होईल. असेही सांगण्यात आले आहे. 

Edited By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com