लॉकडाउनच्या विरोधात सोलापूर महापालिकेसमोर व्यापाऱ्यांचे आंदोलन...  

Traders agitation in front of Solapur Municipal Corporation
Traders agitation in front of Solapur Municipal Corporation

सोलापुर : सोलापूर Solapur शहरात लॉकडाऊनच्या Lockdown विरोधात व्यापाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. माजी आमदार दिलीप माने Dilip Mane यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांनी उपोषण पुकारलं आहे. Traders agitation in front of Solapur Municipal Corporation 

व्यापारी वर्ग सध्या मृत्यूशय्येवर आहे. हे दाखवण्यासाठी एका व्यापाऱ्याला प्रतिकात्मकरित्या सलाईन लावून अनोख्या पद्धथीने निषेध व्यक्त केला आहे. सोलापूर शहरात कोरोनाची Corona परिस्थिती आटोक्यात असताना देखील केवळ नियमांमुळे प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये कोणतेही शिथिलता दिलेली नाही. 2011 च्या जणगणेनुसार सोलापूर शहराची लोखसंख्या ही 10 लाखाहून कमी आहे.

महानगरपालिका स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार नाही, असा दावा करत पालिकेने ग्रामीण Rural भागातील आदेशच शहरात ही लागू केले आहेत. वास्तविक: सोलापूर शहराची लोकसंख्या सध्या 10 लाखाहून अधिक आहे. तसेच शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा केवळ 2 ते 3 टक्के आहे. तसेच शहरात 55 टक्के ऑक्सिजन Oxygen बेड Bed देखील शिल्लक आहेत. पालिकेने स्वतंत्र निर्णय काढून शहरातील निर्बंध शिथील करत व्यापार सुरु करावेत अशी मागणी व्यापाऱ्यांची आहे. Traders agitation in front of Solapur Municipal Corporation

हे देखील पहा 

व्यापारी संघाने लोकप्रतिनिधींना घेऊन पालिका आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला,मात्र आयुक्त उपलब्ध नसल्याने लोकप्रतिनिधी आणि व्यापारी उपायुक्तांकडे आपली मागणी मांडली, परवानगी न मिळाल्यास लॉकडाऊन झुगारून दुकाने सुरु करण्याचा इशारा व्यापाऱ्यांकडून महापालिका Municipal Corporation प्रशासनाला देण्यात आला आहे. 

Edited By- Digambar Jadhav
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com