कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश - जयंत पाटील

jayant patil
jayant patil

मुंबई - कुकडी Kukadi प्रकल्पाच्या Project पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी दिली. पिंपळगाव जोगे धरणाच्या लाभ क्षेत्रातील काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले होते. Success in resolving the issue of water distribution of Kukdi project 

त्यामुळे कुकडीच्या पाणी आवर्तनाला स्थगिती मिळाली होती. यासंबंधी शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अबाधित राहील असे आश्वासित केलेलं आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 

हे देखील पहा -

कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन करून सगळ्यांची काळजी कायमची मिटेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगतानाच कुकडी प्रकल्प हा महाराष्ट्रातील जुना प्रकल्प आहे. शरद पवार Sharad Pawar यांच्या दूरदृष्टीने हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. Success in resolving the issue of water distribution of Kukdi project 

परंतु आता ३० ते ४० वर्षांनंतर पाण्याच्या मागणीनुसार काही बदल करणे आवश्यक आहे. या कामासाठी या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले. ही महाविकास आघाडी सरकारची महत्वाची उपलब्धी ठरेल असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com