शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारातच गुरुजींचे पाणावले डोळे

Saam Banner Template
Saam Banner Template

20 मार्च 2020 पासून ज्ञानाचे मंदिर असलेल्या देशभरातील शाळा बंद झाल्या, दररोज विद्यार्थ्यांचे निरागस चेहरे डोळ्यासमोर ठेवून, शिक्षणाचे धडे देणाऱ्या गुरुजींना कधी नव्हे ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याची दुर्दैवी वेळ कोरोणा महामारी च्या संकटामुळे आली, आज न उद्या आपली शाळा सुरू होईल आणि पुन्हा एकदा शाळेत विद्यार्थ्यांचे नंदनवन फुलेल ही भोळीभाबडी आशा घेऊन, विद्यार्थी  शिक्षकांकडून दररोज ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र आता या सर्व परिस्थितीला विद्यार्थी देखील कंटाळलेत आणि हे स्पष्ट झालंय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकत्व घेतलेल्या हिंगोली जिल्ह्यातील एका शाळेत गुरुजी व विद्यार्थ्यांमध्ये झालेला भावनिक संवाद जाणून घेऊयात. (Students arrive at school on the first day of school) 

आज 15 जून शाळेचा पहिला दिवस, उन्हाळी सुट्ट्या संपल्या की विद्यार्थी आपली दप्तरे घेऊन शाळेमध्ये दाखल होतात.  दरवर्षी शिक्षक देखील त्याच हर्ष उल्हासात स्वागत करतात. हिंगोली शहरातील माणिक स्मारक आर्य विद्यालयात आज दुपारी वेगळंच चित्र पाहायला मिळालं, संस्थेचे पदाधिकारी व शाळेतील शिक्षक हे आपल्या कामात मग्न असताना, अचानक 15 ते 20 विद्यार्थ्यांचा घोळका, मुख्याध्यापक सरांची परवानगी घेऊन शाळेतील कार्यालयात आला.  विद्यार्थ्यांनी गुरुजींना एक साथ नमस्ते करत, नमन केले, एवढे विद्यार्थी सोबत का बरे आले असावे असा प्रश्न गुरुजींना पडला, तितक्यात एका विद्यार्थ्याने सरांना बोलायला सुरुवात करत, गुरुजी आम्ही घरी बसून कंटाळलो आहोत. ऑनलाइन शिक्षणाचे धडे आता घ्यावेसे वाटत नसल्याने, आम्हाला शाळेत येण्याची घाई झाली, त्यामुळे गुरुजी आता तुम्हीच सांगा आमची शाळा कधी सुरू होणार. 

हे देखील पाहा

या विद्यार्थ्यांची भावनिक साद पाहून शाळेचे मुख्याध्यापक यांचे ही डोळे पाणावले , विद्यार्थी मित्रांनो सध्या कोरोनाची महामारी सुरू आहे, याचे गंभीर परिणाम आपला देश भोगत असून, तुमच्या शिक्षणासोबतच तुमचा प्राण देखील महत्त्वाचा असल्याचे गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितले, त्यासोबतच शासनाचे शाळा सुरू करण्याबाबत आदेश प्राप्त होताच तुम्हाला शाळेत बोलावून तुमचे स्वागत करतो असे गुरुजींनी सांगितले. 

सहा दशकांपासून  माणिक स्मारक शाळा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. उन्हाळी सुट्टीत देखील ज्या विद्यार्थ्यांना अध्यापन घ्यावेसे वाटते अशा विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सुट्ट्यात देखील सुरू असते. शाळेला कुलूप लावण्याची दुर्दैवी वेळ या अगोदर कधीही आली नसल्याचं माणिक स्मारक आर्य विद्यालय या संस्थेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश भारूका यांनी सांगितले. 

माणिक स्मारक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोच्या घरात आहे. शहराच्या मुख्य भागात असलेली ही शाळा विद्यार्थ्यांनी भरगच्च भरलेली दिसत असल्याने या ठिकाणी नंदनवन फुलले दिसायचे मात्र विद्यार्थ्यांनविना आमची शाळा स्मशान झाली आहे. ईश्वरा लवकर करूनच संकट निवारण दे आणि शाळेचं नंदनवन फुलू दे अशी भावनिक साद या ठिकाणचे शिक्षक घालत आहेत. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com