स्पायडरमॅन होणार गायब?

स्पायडरमॅन होणार गायब?

लॉस एंजलिस - जगभरातील मुलांचा लाडका सुपर हिरो स्पायडरमॅन अलविदा करण्याची शक्‍यता आहे. सोनी कंपनी आणि डिस्ने कंपनी यांच्यातील वादामुळे भविष्यात मार्व्हल स्टुडिओच्या चित्रपटातून स्पायडरमॅन दिसण्याची शक्‍यता धूसर झाली आहे.

मार्व्हल स्टुडिओचे अध्यक्ष केव्हिन फीज यांनी स्पायडरमॅन चित्रपटाची निर्मिती करणार नसल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटात स्पायडरमॅनची दिसण्याची शक्‍यता कमी आहे.

1985 पासून मार्व्हल पात्राचे हक्क सोनीकडे आहेत. मात्र, 2015 नंतर त्यांनी डिस्ने आणि मार्व्हल यांच्यासमवेत भागीदारीची घोषणा केली. त्यामुळे मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटात स्पायडरमॅनचे पात्र दिसू लागले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, स्पायडरमॅनच्या आगामी चित्रपटात सोनी कंपनीने 50 टक्के अर्थसाह्य करावे, अशी डिस्ने कंपनीची इच्छा आहे. मात्र, सोनी कंपनीला ही अट मान्य नाही. जुन्याच अटींवर काम करणार असल्याचे सोनीने स्पष्ट केले आहे. परंतु, डिस्ने यावर समाधानी नाही. जर उभय कंपनीतील वाद लवकर शमला नाही, तर मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटात स्पायडरमॅनची उणीव भासू शकते.



Web Title: Spiderman Movie Making Close

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com