पाच हजार किलो चांदीच्या दागिन्यांची तस्करी; डीआरआयकडून तिघांना अटक

Silver
Silver

मुंबई : चांदीच्या Silver तस्करीत सक्रिय असलेल्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात महसूल गुप्त वार्ता संचालनालयाला (डीआरआय) DRI यश आले असून टोळीने आतापर्यंत पाच हजार किलो चांदीची Silver तस्करी केल्याचे निष्पन्न झाले आहे. Silver Smuggling Racket caught by DRI In Mumbai

याप्रकरणी साडेचार कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. आता तिघांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही या प्रकरणी चांदीच्या व्यावसायिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

मार्चमध्ये मुंबई विमानतळावरील Mumbai Airport कार्गोमध्ये आलेल्या दोन संशयित कन्साईनमेंटमुळे सर्व प्रकार उघड झाला. कन्साईनमेंटमध्ये १९३ किलो रिंगबार असल्याचे दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात कन्साईन्मेंटचे वजन साडेसहाशे किलोपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले होते.

कन्साईनमेंटचा पत्ता अंधेरीतील एका अपार्टमेंटचा देण्यात आला होता; पण तांत्रिक कारणाने कन्साईनमेंट तेथे पोहोचू शकले नाही. तपासणीदरम्यान एका कन्साईनमेंटमध्ये ४३३ आणि दुसऱ्यामध्ये १७८ किलो चांदीचे दागिने सापडले. Silver Smuggling Racket caught by DRI In Mumbai

या प्रकरणी अंधेरीतील रहिवासी असलेल्या मोहम्मद हनिफ नुरानीला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत त्याने आतापर्यंत पाच हजार किलो म्हणजेच ३३ कोटी ३० लाखांच्या चांदीच्या दागिन्यांची तस्करी Smuggling केल्याचे सांगितले. चांदी तस्करीप्रकरणी सांताक्रूझमधील Santakruz व्यावसायिक मनीष बिरावट याला ताब्यात घेण्यात आले होते. दोघांच्या चौकशीतून अविनाश राव (४०), कमलेश राजपूत (४०) व प्रवीण शिंदे (२७) यांना अटक करण्यात आली. सीमा शुल्क कायद्याच्या विविध कलमांतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com