शेअर बाजारात विक्रमी उसळी

शेअर बाजारात  विक्रमी उसळी


मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजाराबाबत म्हणाल तर, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, सन फार्मा आणि येस बँक यांच्या समभागांमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर इन्फ्राटेल, जी. लिमिटेड, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, ग्रासिम यांचे समभाग घसरल्याचं चित्र होतं. दरम्यान, कालही शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक ओघ वाढवला. एफपीआयने चालू महिन्यात आतापर्यंत १७,७२२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ऑक्टोबरमध्येही हा आकडा १७,५४७ कोटी रुपये होता. एफपीआयची गुंतवणूक ही बाजारावरील विश्वासासाठी महत्त्वाची मानली जाते. शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्सनं विक्रमी पातळी गाठली आहे. सेन्सेक्स मंगळवारी सकाळी व्यवहार सुरू होताच ४१,०२२.८५ अंकांवर खुला झाला. पहिल्यांदाच सेन्सेक्स ४१,००० अंकांच्या पल्याड खुला झाला. दुसरीकडे निफ्टी ३६.४५ अंकांनी वाढून १२, ११०.२० अंकांवर खुला झाला.


सुरुवातीच्या व्यवहाराच्या सत्रातच सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ९ वाजून २८ मिनिटांनी सेन्सेक्सचे २१६.४८ अंकांच्या वाढीसह ४१,१०५.७१ अंकांवर व्यवहार सुरू होते. तर निफ्टी ५६.४५ अंकांच्या वाढीसह १२, १३०.२० अंकांवर ट्रेड करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ज्या समभाग खरेदीत गुंतवणुकदारांनी रस दाखवला, त्यात येस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, ओएनजीसी आणि सन फार्मा यांचा समावेश होता. दुसरीकडे भारती एअरटेल, पावरग्रीड, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक आणि एलअँडटी यांच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली.
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार संबंध सुधारण्याच्या अपेक्षा उंचावल्यानं सोमवारी आशियाई बाजारात तेजी दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. जगातील प्रमुख शेअर बाजारही सोमवारी तेजीत होते. चीन, जपान व कोरीया आदी आशियातील शेअर बाजारही एक टक्क्याने वधारले. भारतीय बाजारांवर याचाही चांगला परिणाम झाला.

Web Title share market bse sensex opens on new all time high crosses 41000 mark for the first time

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com