शेतकऱ्यांना ‘रोबो’ विका, लग्नाचा प्रश्न मिटवा : विवेक सावंत

शेतकऱ्यांना ‘रोबो’ विका, लग्नाचा प्रश्न मिटवा : विवेक सावंत

लातूर : शेतकरी अडचणीत असल्यामुळे ‘शेतकरी नवरा नको’, असे सर्रास म्हटले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रात्रदिवस शेतीत काम करणारा रोबो आपल्याकडे विकसित झाला तर त्याची विक्री करत शेतकऱ्यांच्या बऱ्याच मुलांना आपल्या रोजगाराचा प्रश्न मिटवता येईल. शिवाय, त्यांचे लग्नही आपोआप जुळेल, असे मत महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) कार्यकारी संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

लातूर 'सिनर्जी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड'चा स्नेहमेळावा गुरूवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी सावंत यांनी तरुणांशी संवाद साधला. नॅचरल शुगर अलाईड इंडस्ट्रिजचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ‘सिनर्जी’च्या सीमा विजय मालू, महेश पत्रिके उपस्थित होते.

सावंत म्हणाले, ग्रामीण भागातील तरुणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही मुलेसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोचली पाहिजे, असा विचार आपण सतत केला पाहीजे. सध्या ग्रामीण भागातील शेतकरी तरुणांना मुली मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी ‘फार्म रोबो’ची विक्री करणारा व्यवसाय येत्या काळात सुरू करायला हवा. हा रोबो शेतकऱ्यांना कुठल्याही वेळेत शेतीसाठी मदत करणारा आणि सौरउर्जेवर कार्यरत असणारा हवा. यामुळे शेतकऱ्यांनाही मोठी मदत होईल. 

अपेक्षित गुणांच्या मागे धावणारा लातूर पॅटर्न आता बदलायला हवा. अनपेक्षित प्रश्नांना आपण सामोरे जायला हवे, असेही ते म्हणाले.

Web Title: Sell Robo to farmers and solve problem of marriage says MKCLs Vivek Sawant

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com