शनीच्या एकूण 20 चंद्राचा शोध

शनीच्या एकूण 20 चंद्राचा शोध


सूर्यमालिकेत सहाव्या स्थानावर असलेल्या शनी ग्रहाला आत्तापर्यंत एकूण ६२ चंद्र असल्याचे मानण्यात येत होते. मात्र अलीकडेच खगोलशास्त्रज्ञांनी शनीचे आणखी २० चंद्र शोधून काढल्यामुळे आता शनीला एकूण ८२ चंद्र असल्याचे 'कॅरनेजी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' या संस्थेचे ड‌ॉ. स्कॉट शेपर्ड यांनी जाहीर केल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

नव्याने शोधण्यात आलेले शनीचे हे २० चंद्र साधारणत: पाच किलोमीटर व्यासाचे असून ते शनीभोवती उलट्या दिशेने भ्रमण करत आहेत. आत्तापर्यंत आपल्या सूर्यमालिकेत सर्वाधिक चंद्र गुरू ग्रहाला (७९) आहेत, असे समजले जात होते. मात्र शनीच्या चंद्रांची संख्या ८२वर गेल्याने सर्वाधिक चंद्र असलेल्या ग्रहाचा मान शनीने पटकावला आहे. आपल्या सूर्यमालेत बुध आणि शुक्र या ग्रहांना चंद्र नसून पृथ्वीला केवळ एक चंद्र आहे. तर, मंगळ (२), गुरू (७९), शनी (८२), युरेनस (२७), नेपच्यून (१४) आणि प्लुटो (५) या ग्रहांना एकपेक्षा जास्त चंद्र असल्याचे सोमण यांनी सांगितले.


Web Title Saturn has a total of 82 moons.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com