'पुढचा पंतप्रधानही उत्तर प्रदेशातूनच'

'पुढचा पंतप्रधानही उत्तर प्रदेशातूनच'

लखनौ : सध्याचा पंतप्रधान हा उत्तर प्रदेशातील जनतेने निवडून दिलेला आहे आणि पुढचा पंतप्रधानही उत्तर प्रदेशातील जनताच निवडून देईल. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी असून, भाजपला जोरदार लढत देण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यांचे मतदान झाले असून, रविवारी सहाव्या टप्प्याचे मतदान होत आहे. आजमगढ येथे झालेल्या सभेनंतर अखिलेश यादव यांनी दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे.

अखिलेश यादव म्हणाले, की सप आणि बसप आघाडीला उत्तर प्रदेशात मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भाजपची भाषाच बदलली आहे. गेल्या पाच टप्प्यांमध्ये आम्हाला सर्वाधिक जागा मिळत आहेत. भाजपने 2014 मध्ये दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे युवक, शेतकरी, व्यापारी आणि गरिब यांनी भाजपला नाकारले आहे. नोटाबंदीमुळे न दहशतवाद थांबला न नक्षलवादी हल्ले. वाराणसीमध्ये एक जवान निवडणुकीच्या मैदानात उतरला तर त्याची तक्रार करून रोखण्यात आले.  

Web Title: Samajwadi Party chief Akhilesh Yadav talked about next prime minister

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com