सोने चांदीच्या दरात तेजी !

Rise in price of Gold and silver
Rise in price of Gold and silver

सोने Gold चांदीच्या Silver दरात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या घसरणीनंतर आज अचानक सोन्याच्या दरात तेजी आली आहे. ९ जून रोजी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात ०.१० टक्क्यांची वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात ०. २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. Rise in price of Gold and silver 

आज सोन्याचा भाव ४० रुपयांनी तर चांदी ३०० रुपयांनी महाग झाली आहे.आज ९ जून रोजी  एमसीएक्सवर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात ०.१० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे सोन्याचे दर ४९,१७४ रुपये प्रति तोळावर पोहोचले असून चांदीचे दर ०.२२ टक्क्यांच्या वाढीनंतर आता ७१,३८८ प्रति किलोवर पोहोचले आहे.

अमेरिकन America ट्रेजरीची घटणारी कमाई आणि कमजोर अमेरिकन डॉलर त्यामुळे आता चिंता वाढली आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक एक सुरक्षितता मानली जाते आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत असून देशांतर्गत भागातही दर वाढत आहेत.

हे देखील पहा - 

आज जरी सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरीही हा भाव गेल्यावर्षीच्या सर्वोच्च स्तरापेक्षा जवळपास 7000 रुपयांनी असल्याचे बोलले जात आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर ५६,२०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते.

Edited By-Shiwani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com