चुकून खात्यावर आलेले '32 लाख' केले परत

waghole
waghole

खर तर कोणाच्याही बँक खात्यात (Bank Account) एवढी मोठी रक्कम आल्यावर त्याला आनंद झाल्या वाचून राहणार नाही. परंतु, अश्विनी वाघोले यांनी अगदी प्रामाणिकपणे ही रक्कम परत केली आहे. वाघोले यांच्या यशोधन एचपी गॅस एजन्सी वाल्हे या बँक ऑफ महाराष्ट्र वाल्हे शाखा बँकेच्या खात्यामध्ये 05 मार्च  2020 रोजी 32 लाख 68 हजार 85 रुपये आले होते हे पैसे कुठून आले ते कोणी पाठवले या बाबत कोणतीच माहिती मिळत नव्हती. (Returned Rs 32 lakh to the bank account)

बँकेत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की हे  पैसे कोठून आले आम्हाला माहीत नाहीत आम्ही चेक करून सांगतो. बँकेमध्ये कागदोपत्री व्यवहार करून ते पैसे परत पाठवण्याची बँकेला विनंती केली. अश्विनी अमोल वाघोले यांचे दिर व परिंचे गावचे पोलीस पाटील अविनाश वाघोले यांनी कागदपत्रांची पूर्तता करून हे पैसे परत पाठवण्याची विनंती केली.  

 हे देखील पाहा

बँकेला ते पैसे परत पाठवयासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला. COLA SLAO 22. कंपनीचे  पैसे होते.  या चार महिन्यांमध्ये  कंपनीच्यावतीने साधी विचारणाही करण्यात आली नाही. आज अखेर बँकेने ते पैसे 32 लाख 68 हजार 85 रुपये परत ज्या खात्यावरून आले त्या खात्यावर ट्रान्सफर केले गेले. वाल्हे व परिंचे परिसरात अश्विनी अमोल वाघोले व अविनाश यशवंत वाघोले पोलीस पाटील कुटुंबियांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करीत आहेत.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com