खासगी बॅंकातून ठेवी काढू नये, रिझर्व्ह बॅंकेचे राज्य सरकारांना आवाहन

खासगी बॅंकातून ठेवी काढू नये,  रिझर्व्ह बॅंकेचे राज्य सरकारांना आवाहन

मुंबई: राज्य सरकारांनी त्यांच्या ठेवी खासगी क्षेत्रातील बॅंकांमधून काढून घेऊ नयेत असे सांगण्यात आले आहे.  खासगी क्षेत्रातील बॅंकांमधील त्यांचा पैसा सुरक्षित आहे, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने राज्य सरकारांना दिली आहे.
ज्या राज्य सरकारांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल किंवा जर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असेल तर त्यांनी त्याचा फेरविचार करावा असेही रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.
खासगी क्षेत्रातील बॅंकांमधून पैसा काढून घेतल्याने देशातील बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे निर्णय घेणे टाळावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  येस बॅंक आर्थिक संकटात सापडली होती. त्यानंतर येस बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातले. त्यामुळे काही राज्य सरकारांनी आपल्या विभागांना खासगी बॅंकांमधील ठेवी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांकडे वळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
राज्य सरकारांच्या या पावलामुळे देशातील बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या स्थैर्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. तसेच खासगी बॅंकांमधील पैशाच्या सुरक्षिततेसंदर्भात चुकीची धारणा निर्माण होते आहे. हे सर्व वित्तीय क्षेत्र आणि बॅंकिंग क्षेत्राच्या हिताला बाधा आणणारे ठरेल असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.
दरम्यान खासगी बॅंकांमधील त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत, असेही रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

 

Webtitle: Reserve bank appeal not to withdraw money from private banks

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com