अंबरनाथमध्ये मनसेने उघडकीस आणला रेमडेसिविरचा काळाबाजार

Remdisivir
Remdisivir

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये Ambarnath नगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये Covid Care center रेमडेसिविर Remdesivir इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार मनसे कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. Remdesivir black market exposed in Ambernath

नगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्णांना देण्यासाठी शासनाकडून Government आलेले इंजेक्शन्स तब्बल 20 हजार रुपयांना परस्पर बाहेर विकले जात असल्याचा प्रकार मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी रंगेहात पकडून दिला. 

अंबरनाथ पालिकेने शहरातील कोव्हीड रुग्णांसाठी डेंटल कॉलेज येथे कोव्हीड सेंटर उभारले असून तिथे 600 रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयामध्ये शासनाकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. मात्र या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून रेमडेसिविर इंजेक्शन्स विकत घेण्यासाठी बनावट गिऱ्हाईक तयार केले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास डेंटल कॉलेजच्या बाहेर तिथल्याच नगरपालिका रुग्णवाहिकेच्या चालकाने दोन रेमडेसिविर इंजेक्शन आणून दिले आणि या सापळ्यात तो अलगद अडकला.

धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिकेच्या चालकाने आपल्याला हे इंजेक्शन्स मुख्य डॉक्टर अतुल मुंडे यांनी बाहेर देण्यासाठी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. डॉक्टर अतुल यांनी आपल्याला एक कागदाची पुडी हातात दिली आणि बाहेर उभ्या असलेल्या एका इसमाला देऊन येण्यास सांगितले, ते आपले वरिष्ठ असल्यामुळे आपण त्यांचं ऐकलं आणि ही पुडी बाहेर नेऊन दिली.  मात्र त्यात इंजेक्शन असल्याची माहिती आपल्याला नव्हती, असा खुलासा यावेळी रुग्णवाहिकेचा चालक कुणाल भंडारी याने केला आहे. Remdesivir black market exposed in Ambernath

या प्रकाराबाबत डॉक्टर अतुल मुंडे यांना विचारलं असता त्यांनी ज्या ब्रँडची इंजेक्शन्स पकडली गेली आहेत, त्या ब्रँडचे इंजेक्शन आपल्या रुग्णालयात येतच नसल्याचा दावा केला. तसेच पोलीस ठाण्यात जाऊन खरं खोटं करण्याची तयारी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. 

या सगळ्या प्रकारामुळे अंबरनाथ शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अंबरनाथ शहरात एप्रिल महिन्यात 61 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यापैकी 55 जणांचा मृत्यू हा एकट्या डेंटल कॉलेजमध्ये झाला होता. त्यामुळे अशा प्रकारे डेंटल कॉलेजचे इंजेक्शन्स बाहेर विकले जात असल्यामुळे तिथल्या रुग्णांचे तडफडून मृत्यू होत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Edited By - Krushna Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com