वाचा ! कोकणात कोणामुळे आलं कोरोनाचं सकंट  

वाचा ! कोकणात कोणामुळे आलं कोरोनाचं सकंट  


सिंधुदुर्ग: रत्नागिरीत करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी करोनाच्या ५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात करोनाचे एकूण सहा अहवाल प्राप्त झाले होते त्यातील ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले आहेत. चार अहवाल कळंबणीतील उपजिल्हा रुग्णालायतून पाठवण्यात आलेल्या स्वॅबचे आहेत तर एक अहवाल रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या स्वॅबचा आहे. अन्य एक अहवाल निगेटिव्ह आढळला आहे. आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२वर जाऊन पोहचली आहे. या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासने युद्धपातळीवर उपाययोजना करत आहेत.
 

जिल्ह्यात सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे आणि मुंबईकर मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहेत. मुंबईहून आलेल्या व्यक्तींना वेगवेगळ्या शाळा- महाविद्यालयाच्या इमारतींत अलगीकरण करण्यात आले आहे पण प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. खेड्यातील शाळांमधून आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे अलगीकरणात ठेवलेल्यांची नाराजी दिसून येत 

मुंबईशी जवळीक असलेल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून चाकरमान्यांचा ओघ वाढल्याने व नव्याने आढळणारे बहुतांश करोनाबाधित रुग्ण मुंबईतून गावी परतलेले असल्याने दोन्ही जिल्ह्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
उर्वरित ४ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आजवर सापडलेल्या आठही रुग्णांचे मुंबई कनेक्शन आहे. गुरुवारी सापडलेल्या रुग्णांत ५१ वर्षीय महिला होती. तिच्या निकटच्या दोन महिलांना करोनाने गाठले आहे. नेरूर येथीलम तेवीस वर्षीय युवक ६ मे रोजी वाशीहून गावी आला होता. त्याला गावातील शाळा इमारतीत अलगीकरणात ठेवले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला आता जिल्हा रुग्णालयात आलयं 

WebTittle :: Read on! Who caused the coronation in Konkan?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com