वाचा | अनलॉक-१ मध्ये काय सुरू काय बंद 

वाचा | अनलॉक-१ मध्ये काय सुरू काय बंद 

मुंबई ::राज्य सरकारने ३१ मे रोजी 'मिशन बिगिन अगेन'ची घोषणा करीत नियमावली जाहीर केली होती. मात्र, त्यात बदल करण्यात आले असून नव्या मार्गदर्शक सूचना गुरुवारी जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ या भागांत आता नागरिकांना परवानगीशिवाय प्रवास करता येणार आहे. याआधी मात्र अत्यावश्यक सेवा आणि तातडीच्या कामासाठी परवानगी घेऊनच प्रवास करता येत होता. नागरिकांना जवळपास प्रवास करण्यास परवानगी असली तरी लांब प्रवासासाठी मात्र मनाई असेल. 'मुंबई एमएमआर' परिसरात सर्वसामान्यांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे. याशिवाय आज, शुक्रवारपासून मैदानात व्यायामासाठीही बाहेर पडता येईल. बाजारपेठा आणि दुकानेही सुरू होणार आहेत.
राज्य सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ३ जूनपासून 'मिशन बिगिन अगेन' सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळामुळे लोकांना दोन दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. चक्रीवादळाचे संकट टळल्याने शुक्रवारपासून लोकांना घराबाहेर पडता येणार आहे.

काय राहणार बंद? 

पहाटे पाच ते रात्री सात वाजेपर्यंत लोकांना उद्यानात जाता येईल. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावले आदी प्रकारचा व्यायाम करता येणार. मात्र, कोणत्याही ग्रुप अॅक्टिव्हिटीला परवानगी नाही. खुल्या मैदानात गर्दीही करता येणार नाही.राज्यात लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली असली तरी ३० जूनपर्यंत लॉकडाउन कायम आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, स्पा, सलून, स्विमिंग पूल या गोष्टी बंद राहणार आहेत. या दरम्यान रात्री ९ ते पहाटे ५ अशी संचारबंदीही असेल.

काय सुरू राहणार?

खासगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ८ जूनपासून खासगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी यापैकी जी संख्या अधिक त्या क्षमतेने सुरू करता येतील.विद्यापीठ, कॉलेज आणि शाळा यांमध्ये शिकवण्याचे काम सोडून इतर कामे सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. यात ऑनलाइन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येईल.प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ आदींना मास्क वापरून शारीरिक अंतर पाळून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. गॅरेज, वर्कशॉप देखील सुरू करता येणार आहेत.बाजारपेठा, दुकाने सम, विषम तारखेला कामाच्या वेळेत सुरू राहतील. कपड्याच्या दुकानात ट्रायल रूमला परवानगी नसेल.

WebTttle  ::Read | What's on and off in Unlock-1


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com