महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून देशभरात पदयात्रा

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून देशभरात पदयात्रा


नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची उद्या 150वी जयंती. यानिमित्त काँग्रेसने दिल्लीत पदयात्रेचे आयोजन केले आहे. या पदयात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे नेते राहुल गांधी करतील. काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयापासून निघून ते राजघाटपर्यंत या रॅलीचा समारोप होईल. या रॅलीत सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होतील.  काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी सांगितले की, या रॅलीत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना बापूंच्या शिकवणीची शपथ दिली जाईल. काँग्रेसतर्फे संपूर्ण देशात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

राहुल गांधी हे वर्ध्याला महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट देऊन पदयात्रेत सहभागी होणार होती, पण काही कारणाने ही राहुल गांधी यांची वर्धा भेट रद्द झाली. त्यामुळे राहुल गांधी आता दिल्लीतील पदयात्रेचे नेतृत्व करतील, तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या लखनौमधील पदयात्रेचे नेतृत्व करतील. 


Web Title: rally on Mahatma Gandhis 150th anniversary by Rahul Gandhi in Delhi
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com