रजनीकांत यांचा तामिळनाडू सरकारला इशारा

रजनीकांत यांचा तामिळनाडू सरकारला इशारा

चेन्नई : तामिळनाडू सरकारने मद्य विक्रीची सरकारी दुकाने पुन्हा सुरू करू नयेत, असा इशारा प्रसिद्ध चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी रविवारी दिला. ही दुकाने उघडल्यास पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने सत्ताधारी अखिल भारतीय अण्णाद्रमुक पक्षाने पाहू नयेत. सरकारने महसूल वाढीसाठी पर्यायी मार्ग शोधावेत,असे रजनीकांत यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.उच्च न्यायालयाने आॅनलाईन पद्धतीने घरपोच मद्य पुरवण्यास मुभा दिलेली आहे. 


राज्यातील मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला असून, त्याला स्थगिती द्यावी, अशी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर दुसºया दिवशी रजनीकांत यांनी हा इशारा दिला.ते म्हणाले, या कठीण दिवसांत मद्याची दुकाने पुन्हा सुरू केल्यास अ. भा. अद्रमुकला पुन्हा सत्ता मिळण्याची स्वप्ने पाहता येणार नाहीत.  

मात्र राज्य सरकारने उच्च न्यायालयाचा निर्णय हा ‘सरकारच्या कामकाजात न्यायालयीन हस्तक्षेप’ म्हटले आणि संपूर्ण राज्यात मद्याची आॅनलाईन विक्री व घरपोच सेवा देणे शक्य नाही, असे स्पष्ट केले.

WebTittle :: Rajinikanth warns Tamil Nadu government


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com