1 जून ते 31 जुलैपर्यंत पावसाळी मासेमारी बंदी; मत्स्यव्यवसाय विभागाचे आदेश जारी

fishing in india
fishing in india

रायगड :  पावसाच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलै या कालावधी पावसाळी मासेमारी Rainy fishing बंदी लागू करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून Fisheries Department याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास त्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. Rainy fishing ban from 1 June to 31 July orders of Fisheries Department

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, Maharashtra Marine Fisheries Regulation Act 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै करण्याकरीता केंद्र शासनाने Central Government आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुषंगाने, मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालू वर्षी 1 जून ते 31 जुलै असा मासेमारी बंदी कालावधी आदेशित केला आहे. 

हे देखील पहा -

या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात सागरी किनार्‍यापासून 12 सागरी मैलांपर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणार्‍या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. या पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास त्या मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 कलम 14 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल. Rainy fishing ban from 1 June to 31 July orders of Fisheries Department

1 जून 2021 पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना 1 जून 2021 नंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही. व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत कारवाईस पात्र राहतील. त्यामुळे सर्व मासेमारी नौका 31 मे वा तत्पूर्वी बंदरात पोहोचतील, याबाबत संबंधित नौकामालकांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com