राज्यात पुन्हा येणार पाऊस 

राज्यात पुन्हा येणार पाऊस 

पुणे - राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. १७) राज्यात पावसाला सुरवात होणार आहे. तर गुरुवारपासून (ता. १९) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी आज 
(ता. १६) जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात राज्यात जोरदार पाऊस पडला. गुजरातला लागून असलेल्या उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांतही काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे २१६ मिलिमीटर, तर पालघर येथे २३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वसई येथे १०१ मिलिमीटर, माथेरान येथे १३७, भिवंडी येथे १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Rain Monsoon Environment Maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com