खुशखबर! शताब्दी, इंटरसिटीच्या तिकिटात सूट 

खुशखबर! शताब्दी, इंटरसिटीच्या तिकिटात सूट 

शताब्दी, तेजस, इंटरसिटी आणि डबलडेकर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना लवकरच तिकिटांवर २५ टक्के सवलत मिळण्याची शक्यता आहे. या गाड्यांमधील आसने मोठ्या प्रमाणावर रिकामी राहत असल्याच्या पार्श्वभूमीवर होणारे नुकसान कमी करण्यासाठी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमधीस आसनांवरही सवलत देण्यात येणार आहे. सद्य परिस्थितीत ज्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आसने रिकामी राहतात त्या गाड्यांमध्ये सवलत देण्यात येणार असून, त्याबाबतचे सर्वाधिकार संबंधित विभागातील चीफ कमर्शियल ऑफिसरवर सोपविण्यात आले आहेत. 

रेल्वेच्या प्रत्येक विभागाला रिकाम्या राहणाऱ्या गाड्यांची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार देण्यात येणारी सवलत मूळ भाड्यामध्ये देण्यात येणार असून, जीएसटी, आरक्षण शुल्क, सुपरफास्ट टेरिफ आणि अन्य शुल्क मात्र वसूल करण्यात येणार आहे. बोर्डाने जारी केलेल्या पत्रकानुसार गेल्या वर्षी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आसने भरलेल्या गाड्यांमध्ये तिकिटांवर सवलत देण्यात आली होती. रेल्वे बोर्डाने प्रत्येक विभागाला रिकाम्या राहणाऱ्या गाड्यांची माहिती घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या शिवाय ही आसने भरण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही केली आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सवलत देण्यापूर्वी रेल्वेचे मूळ भाडे लक्षात घेण्याविषयीही बजावण्यात आले आहे. 

सवलत देण्यासाठी रेल्वे बोर्डाने सर्व विभागांना पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही सवलत वार्षिक, अर्धवार्षिक अथवा काही ठरावीक कालावधीसाठीही देण्यात येऊ शकते. एका प्रवाशाला एकदाच अशाप्रकारची तिकिटात सवलत देण्यात आल्यानंतर अन्य कोणत्याही सवलतीचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उदाहरणार्थ...शताब्दीमध्ये अशा प्रकारची सवलत मिळविल्यानंतर ग्रेडेड डिस्काउंट आणि फ्लेक्सी फेअर योजनांचा लाभ घेता येणार नाही. ही योजना लागू झाल्यानंतर चार महिन्यांनी अहवाल पाठविण्याचे आदेशही रेल्वे बोर्डाने संबंधित विभागांना दिले आहेत. 


Web Title : railway 5 discount on tickets of shatabdi express intercity express and tejas express

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com