पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांचा कुटूंबियांचं दिल्लीत उपोषण

पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांचा कुटूंबियांचं दिल्लीत उपोषण

वर्धा - पुलवामा हल्ल्याने सैन्यांचे बलिदान, त्यागाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पाकिस्तानला धडा शिकवावा, अतिरेक्‍यांना ठेचून टाकावे, अशी भावना व्यक्त होऊ लागली. तर दुसरीकडे राष्ट्रपती आणि शौर्य पुरस्कार मिळूनही शहिदाचा दर्जा न मिळाल्याने या दर्जाकरिता १३ शहीद जवानांच्या परिवारांनी शासनाने दिलेल्या पुरस्कारासह मृतदेहासोबत आलेला तिरंगा परत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुलगाव येथील बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांनी दिल्ली येथे सोमवारी (ता. २५) पासून उपोषण पुकारले आहे. या उपोषणात सहभागी होण्याकरिता हे सर्व परिवार शनिवारी (ता. २२) दिल्लीला रवाना झाले आहेत. यासंदर्भातील माहिती त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे दिली आहे. नोकरी आणि सुविधांची घोषणा वाऱ्यावरच राहिली. 

पुलगाव येथील दारूगोळा भांडारात ३१ मे २०१६ रोजी झालेल्या स्फोटात एकूण १९ जवान शहीद झाले होते. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, शौर्य पुरस्कार देण्यात आला. मात्र केवळ सहा जवानांना शहिदाचा, तर नऊ जवानांना शहिदासारखा दर्जा देण्यात आला. या निर्णयाविषयी १३ कुटुंबांनी नाराजी व्यक्त करीत उपोषणाचा निर्णय घेतला. 

शहीद परिवारातील सतवीरसिह पुनिया, राजपालसिंह, अमेदसिंह, संतलाल, ओमप्रकाश पलवल, रामनारायण यादव, विकास पाखरे, जया प्रमोद मेश्राम, सोहबा लीलाधर चोपडे, प्राची ए. धनकर, रोहिणी मेश्राम, वसंत येसनकर, गंगाधरराव बलस्कर आदी उपोषण करणार आहेत.

शासनाने शहीद झालेल्या सर्वच जवानांना शहिदाचा दर्जा देणे अपेक्षित होते. पण येथे तसे झाले नाही. केवळ सहा जवानांनाच हा दर्जा देण्यात आला. यामुळे दिल्लीत जंतरमंतर येथे उपोषण करून मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार, शौर्य पुरस्कार, मृतदेहावर आलेला तिरंगा, मिळालेले सर्वच प्रमाणपत्र परत करणार आहोत. 
- विकास पाखरे, शहीद बी. पी. पाखरे यांचा मुलगा, पुलगाव, जि. वर्धा

Web Title: Pulgav Blast Martyr Chopade Family Fasting in Delhi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com