पबजी मोबाईल इंडिया दक्षिण कोरिया-आधारित गेम कंपनी गेम डेव्हलपर क्राफ्टन Krafton यांनी ही घोषणा केली आहे कि, पबजी मोबाइलची PUBG Mobile भारतीय आवृत्ती आज, 18 मेपासून पूर्व-नोंदणीसाठी Pre-registration उपलब्ध होणार आहे. Pre Registration Of PUBG Mobile India Starts From Today
पबजी चाहत्यांना आणि खेळाडूंना गेम खेळण्याकडे आकर्षित करण्यासाठी क्राफ्टनने या खेळासाठी पूर्व-नोंदणी करणाऱ्यांसाठी विशेष पुरस्कार Rewards जाहीर केला आहे. कंपनीने नमूद केले आहे की, हे पुरस्कार केवळ भारतीय India वापरकर्त्यांसाठी विशिष्ट असे असतील. हे बक्षिसे काय असणार आहेत याबद्दल सध्या कंपनी ने याबद्दल गोपनीयता बाळगली असली तरी, क्राफ्टनने सांगितले की हा गेम मोबाईल डिव्हाइस - आयओएस Ios आणि अँड्रॉईड Android दोन्हीवर खेळण्यास मोकळा असेल.
बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाने पबजी मोबाइल सारख्या गेम मोडची ऑफर केली आहे ज्यात बॅटल रोयले, टीम डेथ मॅच, वॉर इत्यादी सर्व नवीन असणार आहे. क्राफ्टनने असेही घोषित केले की, हा गेम आउटफिट्स आणि फिचर्स सारख्या इन-गेम इव्हेंटसह रिलीज होईल. आणि त्याचे स्वतःचे एस्पोर्ट्स इकोसिस्टम सिस्टम टूर्नामेंट्स आणि लीग्स असतील. Pre registration of PUBG Mobile India starts from today
बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची पूर्व-नोंदणी कशी करावी?
बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया अँड्रॉइड डिव्हाइसवर पूर्व-नोंदणीसाठी उपलब्ध असेल.
पूर्व-नोंदणी करण्यासाठी, गुगल प्ले स्टोअर वर जा, गेम शोधा आणि “प्री-रजिस्टर” बटणावर टॅप करा.
यानंतर, आपण सहजपणे या पेज प्ले स्टोअरवर वर जाऊन प्री-रजिस्टर - बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया . करू शकता.
नकाशे, गेमप्ले आणि नवीन वैशिष्ट्ये:
बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये अल्पवयीन मुलांसाठी निर्बंध असतील:
क्राफ्टनने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांसाठी काही विशिष्ट बंधने जाहीर केली आहेत.
तथापि, कंपनी आपल्या वापरकर्त्यांचे वय कसे सत्यापित करेल याबद्दल अस्पष्ट आहे.
Edited By- Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.