उजनी पाणी प्रश्नावरून 'या' काँग्रेस नेत्याची दत्तात्रय भरणेंवर टीका

wale and bharne
wale and bharne

सोलापूर - उजनी Uajni धरणातील पाणी वाटपावरून आधीच मराठवाडा Marathwada विरुद्ध सोलापूर Solapur यांच्यात रणकंदन सुरू असतानाच, पालकमंत्री दत्तात्रय भरणे Dattatray Bharane यांनी उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर Indapur तालुक्‍याला देण्याची प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता उजनी पाणी प्रश्नावरून सोलापूर Solapur काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले Prakash Wale यांनी राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे जोरदार निशाणा साधला आहे.  Prakash Wale criticizes Dattatray Bharane on Ujani water issue

पालकमंत्र्यांनी सोलापूरच्या नादाला लागू नये, ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला सोलापूर अन्याय खपवून घेत नाही याची जाण ठेवावी अशी बोचरी  टीका काँग्रेस Congress शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर केली आहे.

उजनी पाणी Water प्रश्नावरून सोलापूरकर रस्त्यावर उतरतील आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पालकमंत्र्यांच्या या चुकीच्या निर्णयाचा रस्त्यावर उतरून सामना करेल तसे तर असे काही घडणार नाही असे मला वाटते पण काही घडल्यास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही असे खळबळजनक वक्तव्य यावेळी प्रकाश वाले यांनी केले. Prakash Wale criticizes Dattatray Bharane on Ujani water issue

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेविषयी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह Swabhimani Shetkar Sanghatana विविध राजकीय पक्षांनी देखील इंदापूरला पाणी देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरून सोलापूर विरुद्ध इंदापूर असा नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com