पोलिस आणि महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची केली अँटिजेन टेस्ट

anitgen test
anitgen test

सांगली -  सध्या महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona विषाणूने थैमान घातलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच आता मृतांच्या आकडेवारीतही मोठ्या प्रमाणातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच वाढता संसर्ग लक्षात घेता मिरज miraj शहरात सकाळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लॉकडाऊनचे lockdown नियम भंग करणाऱ्या नागरिकांवर पोलिस police आणि महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने आता कारवाई Action सुरू केली आहे. Police and municipal medical team performed antigen test on the citizens who were wandering for no reason 

भाजीपाला विक्रेते, रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची महापालिका Corporation वैद्यकीय विभाग, महात्मा गांधी चौक पोलीस व महसूल तलाठी यांच्या  संयुक्त पथकाने आज अँटिजेन  टेस्ट antigen test केली. महापालिका आरोग्य अधिकारी, डॉक्टर Doctor व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे 125 लोकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली.

निगेटिव्ह negative टेस्ट आलेल्या नागरिकांना सोडून देण्यात आले. तर पॉझिटिव्ह postitve आलेल्या लोकांना विलीनीकरण isolation कक्षात पाठवण्यात आले. महापालिका सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे स्वछता निरीक्षक मुकादम, महसूल अधिकारी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने सकाळ पासून नागरिकांना पकडून त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यास भाग पाडले. शासनाने दिलेल्या लॉकडाऊन नियमाचे पालन करावे जे नागरिक पालन करणार नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची अँटिजेन टेस्ट करणार असल्याचे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे Dilip Ghorpade यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com