कुजलेल्या लाकडाच्या पोलीस चौकीतून पोलिसांचा कोरोना लढा!

police station
police station

लातूर : जगभर कोरोनाचा Corona  कहर सुरु आहे या काळात जीवाची पर्वा न करता पोलीस Police अधिकारी कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत पण याच पोलीसांना आता जीव मुठीत घेऊन नोकरी करावी लागत आहे. लातुर Latur जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड या आऊटपोस्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता कामकाज करताना जीव टांगणीला लावावा लागतोय. 

सोलापूर-लातुर राज्य महामार्गावरील बेलकुंड या गावी भादा पोलीस ठाण्याचे आऊटपोस्ट कार्यालय आहे.  1993 च्या किल्लारी भूकंपानंतर बेलकुंड येथे ही पोलीस चौकी लाकडी शेड मारून व पत्र्याचा वापर करून तयार करण्यात आली होती. अत्यंत खराब स्थितीत Extremely Bad Condition  असणाऱ्या या पोलीस चौकीचा Police Station पार डब्बा तयार झाला आहे.

हे देखील पहा -

अनेक वर्षे उलटून गेली बऱ्याचदा पोलीस चौकीच्या बांधकामाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयाला पाठवला पण दफ्तरदिरंगाई व लालफितीत चौकीच्या बांधकामाचा निर्णय अद्यापही झाला नाही. 

आता या शेडचे लाकूड सुद्धा कुजून गेले आहे. मोठ्या स्वरूपाचे वादळ वारे आले तर चौकीच उडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.  उन्हाळ्याच्या या दिवसात पोलीस कर्मचाऱ्यांनाया ठिकाणी दुपारच्या वेळी कामकाज करत बसने अशक्य झाले आहे. 

उन्हाळ्याच्या Summer दिवसात दुपारच्या वेळी ही चौकी एखाद्या भट्टी सारखी तापून जात आहे. उन्हाची गर्मी व तकलादू पत्र्याची चौकी अश्या ठिकाणी काम करणे म्हणजे अगदी जीव मुठीत घेऊन जगणे पोलीस अर्थात या कोरोना योद्ध्यांच्या नशिबी आले आहे. त्यामुळे बेलकुंड येथील पोलिसांच्या नशिबी नवी पोलीस चौकी कधी येणार हा आता प्रश्न निर्माण झाला आहे. 

Edited By : Krushna Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com